दहावीच्या परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रक जाहीर, परीक्षा होणार लवकर | Tenth Exam Timetable | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam Timetable

दहावीच्या परीक्षेचे तत्कालिक वेळापत्रक जाहीर, परीक्षा होणार लवकर

बेळगाव : शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेचे (Tenth Exam) तात्कालिक वेळापत्रक (TimeTable) जाहीर केले असून यावेळी दहावीची परीक्षा लवकर घेतली जाणार आहे. मात्र शाळा उशिरा सुरू झाल्याने परीक्षेअगोदर अभ्यासक्रम पूर्ण होण्यास अडचण निर्माण होण्याची शक्यता शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या (Corona) संकटामुळे 2020 व 2021 मध्ये दहावीची वार्षिक परीक्षा जून जुलै महिन्यात घेण्यात आली होती. तसेच या परीक्षेवर विविध प्रकारचे बंधने घालण्यात आली होती. मात्र या वेळी शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकर जाहीर केले आहे. तसेच तात्कालिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थी व पालकांना अक्षय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: पाचवी-आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

मात्र आत्तापर्यंतचा इतिहास पाहता तात्कालिक वेळापत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता कमी असून मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार हे निश्चित आहे. मात्र शिक्षण खात्याने लवकर परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याने अभ्यासक्रम पूर्ण होण्यास अडचण निर्माण होईल असे मत शिक्षण खात्यातून व्यक्त केले जात असून शाळा विलंबाने सुरू झाल्याने अभ्यासक्रमात 20 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. तरी देखील अद्याप बराच अभ्यासक्रम शिल्लक असल्याची माहिती शिक्षकांमधून दिली जात आहे.

नेहमीप्रमाणे प्रथम भाषा विषयाचा पेपर 100 गुणांचा तर द्वितीय व तृतीय भाषा विषयांचा इतर विषयांचे पेपर 80 गुणांचे असणार आहेत. तसेच प्रथम भाषा व ऐच्छिक विषयांचा पेपर लिहिण्यासाठी तीन तास आणि प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. तसेच हे पेपर सकाळी साडेदहा वाजता सुरू होणार आहेत. अशी माहिती देण्यात आली असून परीक्षा लवकर होणार असल्याने विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच परीक्षेचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत असुन कोरोनाचे संकट कमी झाल्यास परीक्षा नियोजित वेळा पत्रकाप्रमाणे पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे मत व्यक्त होत आहे.

हेही वाचा: बार्शी : पत्नीस ठार मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप!

दहावी परीक्षेचे तत्कालिक वेळापत्रक पुढील प्रमाणे

दिनांक- विषय

  • 28 मार्च- मराठी, कन्नड, इंग्रजी, उर्दु (प्रथम भाषा)

  • 30 मार्च - इंग्रजी, कन्नड (द्वितीय भाषा)

  • 4 एप्रिल - गणित

  • 6 एप्रिल - समाज विज्ञान

  • 8 एप्रिल - इंग्रजी, कन्नड (तृतीय भाषा)

  • 11 एप्रिल - विज्ञान

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :exambelgaum
loading image
go to top