10 ची परीक्षा ऑफलाईनच! अभ्यासक्रमातही कपात; वाचा कोणत्या बोर्डाने घेतला निर्णय

मिलिंद देसाई
Sunday, 29 November 2020

दहावीचे वेळापत्रक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात 

बेळगाव : दहावी परीक्षेचे वेळापत्रक डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्‌यात जाहीर करण्यात येणार असुन शाळा सुरु झाल्यानंतर अभ्यासक्रमात 30 टक्‍कांपेक्षा अधिक कपात करण्यात येणार आहे. तसेच दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाईनव्दारे घेणे शक्‍य होणार नाही अशी माहितीही देण्यात आली आहे.

 
कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास अडचण निर्माण होत आहे. मात्र 2021 मध्ये दहावी परीक्षेचे तात्कालीक वेळापत्रक तयार करण्याची सुचना शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी परीक्षा महांमडळला केली आहे. तसेच वेळापत्रक जाहीर करण्यात आल्यानंतर शिक्षण मंत्री वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन सुरुवातीला तात्कालीक वेळापत्रक जाहीर करणार असुन जुन अखेर किंवा जुलै महिन्यात दहावीची परीक्षा होण्याची शक्‍यता आहे. तसेच काही दिवसांपुर्वी शिक्षण खात्याने शाळा सुरु होण्यास विलंब होणार असल्याने अभ्यासक्रमात 30 टक्‍कांची कपात करण्यात निर्णय घेतला होता.

हेही वाचा- अपंगांची योजना कागदावरच; अंमलबजावणी नाहीच

मात्र शाळा सुरु होण्यास अधिक विलंब होणार असल्याने पुन्हा अभ्यासात कपात करण्यासाठी तज्ञांची मदत घेतली जाणार असुन दहावीचे अंतीम वेळापत्रक शाळा सुरु झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असुन सलग दिवस शाळा घेऊन अभ्यासक्रम पुर्ण करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र कोणता अभ्यासक्रम कपात करण्यात आला आहे याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिकविण्यास अडचण होत असुन कपात करण्यात आलेल्या अभ्यासाची माहिती वेळेत देणे गरजेचे आहे. असे मत व्यक्‍त होत असुन दहावीची परीक्षा ऑनलाईनव्दारे घेण्यास खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संघटनेने पुर्ण विरोध दर्शविला आहे. याकडेही शिक्षण खात्याला लक्ष द्यावे लागणार आहे.

संपादन- अर्चना बनगे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tenth schedule ready on december belgaum