
सांगली : लाडकी बहीण योजनेचा अर्ज उशिरा भरला. तो मंजूर झाला, मात्र तोवर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागली. आता कसं होणार? नवं सरकार या ‘नव्या लाडक्या’ बहिणींना मागचे पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये देणार का, याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. नवे सरकार या योजनेसाठी काटेकोर निकष लावणार आहे. त्याची आता महिलांना भीती वाटू लागली आहे. किमान ‘फरक’ तरी मिळावा, अशी अनेक महिलांची अपेक्षा आहे.