
सांगली : शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील पहिला चार मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प बसरगी (ता. जत) येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदुर व गुगवाडमधील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवणे शक्य झाले आहे.