वाढदिवसाचा झिंगाट; विद्यार्थ्यानं केलं धक्कादायक कृत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढदिवसादिवशी झिंगाट झालेल्या विद्यार्थ्याने केलं धक्कादायक कृत्य

वाढदिवसाचा झिंगाट; विद्यार्थ्यानं केलं धक्कादायक कृत्य

बेळगाव : शहापूर परिसरात घरासमोरील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या चार मोटारींची तोडफोड करणाऱ्या तरुणाला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवार (ता. १५) ही कारवाई करण्यात आली असून वाढदिवसानिमित्त अतिमध्य प्रशान केल्यानंतर दारूच्या नशेत आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे.

शनिवारी रात्री ११ ते १ च्या दरम्यान कचेरी गल्लीत येथे घरासमोरील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या तीन मोटारींच्या तर सराफ गल्ली येथे एका मोटारीची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मोटारींच्या काचा फोडणाऱ्या तरुणाची छबी कैद झाली होती.

हेही वाचा: संपकऱ्यांनी विषय तुटेपर्यंत ताणू नये; पवारांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन

त्यानुसार त्याला आज ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्याने मोटारिंची तोडफोड केल्याची कबुली दिली. अटकेतील संशयिताचा त्या दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे त्याने रात्री उशिरापर्यंत मित्रांसमवेत वाढदिवस साजरा केला होता. त्याठिकाणी त्याने अति मद्यप्राशन केले. रात्री चालत घरी येत असताना त्याने नशेच्या अमलात असताना आवण हे कृत्य केले असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top