भक्तनिवासातून सोन्याची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

साईदर्शनासाठी आलेल्या हेमंत पाटील यांना साईबाबा संस्थानाच्या द्वारावती भक्तनिवासातील खोली क्रमांक 143 दिली होती. खोली उघडी ठेवून काल (सोमवारी) सकाळी फोनवर बोलत असताना, त्यांची नजर चुकवून चोराने 52 तोळ्यांचा सोन्याचा गोफ व 40 हजार रुपये ठेवलेली पॅंट पळविली.

शिर्डी : द्वारावती भक्तनिवासातून डोंबिवली येथील हेमंत पाटील या साईभक्ताचे सुमारे 52 तोळ्यांचे सोने व 40 हजार रुपये चोरांनी पळविले. मात्र, याबाबत पाटील यांनी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार केलेली नाही. 
साईदर्शनासाठी आलेल्या हेमंत पाटील यांना साईबाबा संस्थानाच्या द्वारावती भक्तनिवासातील खोली क्रमांक 143 दिली होती. खोली उघडी ठेवून काल (सोमवारी) सकाळी फोनवर बोलत असताना, त्यांची नजर चुकवून चोराने 52 तोळ्यांचा सोन्याचा गोफ व 40 हजार रुपये ठेवलेली पॅंट पळविली. याबाबत पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. मात्र, पाटील यांनी कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Theft in Bhaktanivas at Shirdi