वाईत पीएसआयच्या घरात चोरी

भद्रेश भाटे
गुरुवार, 29 मार्च 2018

गुलमोहर कॉलनीतील बांगल्याचा दरवाज्याचा कोयांडे तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने व 1500/- रुपये रोख असा 50 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आले.

वाई : यशवंत नगर येथील गुलमोहर कॉलनीतील पोलीस उपनिरीक्षकाचे बंद घर फोडून  चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 50 हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला. वाई उपविभागीय पोलिस कार्यालयातील रीडर उपनिरीक्षक शशिकांत बर्गे हे शिंगणापूर यात्रा बंदोबस्तसाठी बुधवारी (ता. 28) गेले होते. तेथून आल्यानंतर गुलमोहर कॉलनीतील बांगल्याचा दरवाज्याचा कोयांडे तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने व 1500/- रुपये रोख असा 50 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आले. हवालदार कृष्णा पवार तपास करीत आहेत.

Web Title: theft in police home in vaai