शाहूपुरीत चोरट्यांचा नऊ लाखांवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शाहूपुरीसारख्या गर्दीने गजबजलेल्या परिसरातील बंगला फोडून चोरट्यांनी दहा तोळे दागिने आणि रोकड असा सुमारे नऊ लाखांचा ऐवज पळवला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.

याप्रकरणी प्रमोद दिगंबर जमदग्नी (वय ५१, रा. जीवन झोका बंगला, शाहूपुरी ४ थी गल्ली) यांनी फिर्याद दिली. श्री. जमदग्नी पत्नी आणि मुलासह येथे राहतात. इमारतीच्या खालच्या मजल्यावर त्यांच्या मालकीची स्फूर्ती शॉपी आहे, 

तर मुलगा सात्विक अभियांत्रिकी शिक्षण घेतो. मुलगा शिक्षणासाठी बाहेर जाणार असल्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी बॅंकेच्या लॉकरमधील ३० तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच काही रोकड घरात आणून ठेवली होती. यामध्ये नेकलेस पाटल्या, चेन, सोन्याची वळी, अंगठ्या, रिंगा आदी सोन्याच्या दागिने व चांदीचे ताट निरंजन आदीचा समावेश होता. चार दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबीयांसह नातेवाइकांकडे घरगुती कार्यक्रमासाठी गेले होते. आज सकाळी ते घरी परत आले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता पहिल्या मजल्यावरील साहित्य विस्कटले असल्याचे तसेच बेडरूममधील कपाटातील लॉकर उचकटून तीस तोळे दागिने आणि रोकड चोरट्यांनी पळवल्याचे निदर्शनास आले. या चोरीची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोचले. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. श्‍वानाने जमदग्नी यांच्या घरच्या बाजूला असणाऱ्या बोळातून पाचव्या गल्लीच्या मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला व ते तिथेच घुटमळले. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः दुकाने आणि बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले व त्यांचे सहकारी करत आहेत. 

आयुष्याची पुंजी चोरीला
श्री. जमदग्नी यांना मुलाला शिक्षणासाठी परदेशी पाठवायचे होते. त्यासाठी पैसे हवे असल्याने काही दागिने बॅंकेत ठेवून कर्ज काढण्याच्या उद्देशाने जमदग्नी यांनी दागिने घरी आणून ठेवले होते; मात्र चोरट्यांनी एका रात्रीत त्यांच्या दागिन्यावर डल्ला मारल्याने त्यांची आयुष्यभराची कमाई चोरट्यांनी पळवल्याने जमदग्नी कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसला आहे.

Web Title: theft in shahupuri