साफसफाईसाठी 'ती' आली अन्‌ गायब झाले चांदीचे ग्लास!

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 7 डिसेंबर 2019

नेहमी पाणी पिण्यासाठी चांदीचे पाच ग्लास होते. त्यादिवशी किचन ट्रॉलीत चांदीचे तीनच ग्लास दिसून आले. त्यानंतर अग्रवाल यांनी घरात चौकशी केली. सगळीकडे शोध घेतला, मात्र ग्लास कुठे सापडले नाहीत.

सोलापूर : दोनच दिवस कामाला आलेल्या मोलकरणीने चांदीचे तीन ग्लास चोरले. संयशावरून घरमालक असलेल्या महिलेने मोलकरणीला शोधून काढले, पण तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : हरवलेल्या आजी सापडल्या  व्हॉटस्‌ अप्‌ व फेसबुकमुळे 

पाणी पिण्यासाठी चांदीचे ग्लास 
याप्रकरणी पुष्पा राजेंद्र अग्रवाल (वय 62, रा. जुनी मिल कंपाउंड, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. अनु असे गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणीचे नाव आहे. ही घटना 29 आणि 30 नोव्हेंबर 2019 रोजी जुनी मिल कंपाउंड परिसरातील अग्रवाल यांच्या घरात घडली आहे. पुष्पा अग्रवाल यांनी नातेवाइकांकडे काम करणाऱ्या अनुला आपल्याकडे धुणीभांडी व साफसफाईसाठी कामाला ठेवले होते. अनुने दोन दिवस अग्रवाल यांच्याकडे काम केले. 1 डिसेंबरला सकाळी सात वाजता अग्रवाल या व्यायाम करून घरी आल्या. त्यानंतर पाणी पिण्यासाठी किचन रुममध्ये गेल्या. त्यांच्याकडे नेहमी पाणी पिण्यासाठी चांदीचे पाच ग्लास होते. त्यादिवशी किचन ट्रॉलीत चांदीचे तीनच ग्लास दिसून आले. त्यानंतर अग्रवाल यांनी घरात चौकशी केली. सगळीकडे शोध घेतला, मात्र ग्लास कुठे सापडले नाहीत. त्यानंतर अग्रवाल यांनी अनुचा पत्ता शोधून काढला.

हेही वाचा : चौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग

तू पोलिस ठाण्यात चल.. 
मोलकरीन अनुला शोधत 6 डिसेंबरला अग्रवाल या रामवाडी परिसरात गेल्या. अनुच्या घराजवळ गेल्या. तिथे अनु आणि तिची बहीण रिक्षात बसून कुठेतरी बाहेर निघाल्या होत्या. तू कामाला का आली नाहीस? माझ्या घरातून चांदीचे तीन ग्लास चोरीला गेले आहेत. ते कोठे आहेत असे विचारले. त्यानंतर अनुने उद्धटपणे संवाद साधला. तू पोलिस ठाण्यात चल असे म्हटल्यानंतर मी येत नाही म्हणून ती निघून गेली. अनुने अग्रवाल यांच्या घरातून तीन हजार 600 रुपयांचे चांदीचे तीन ग्लास चोरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of silver glass at solapur