
"कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. हे काम अद्यापही सुरूच आहे."
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) आलमट्टी धरणाची (Almatti Dam) उंची वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले असले, तरी त्यासाठी त्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागणार आहे. उंची वाढवण्याआधी कर्नाटकातील विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यांतील ७० हजार एकरसह एकूण एक लाख ३३ हजार हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. त्यामुळे आलमट्टीची उंची वाढविली जात असलेली चर्चा केवळ वावड्याच ठरणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.