महावितरणच्या "गो-ग्रीन'मध्ये "एवढे' आहेत वीजग्राहक 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 जानेवारी 2020

सोलापूर ः वीजबिल किंवा पावतीच्या कागदाचा वापर बंद करून पर्यावरणस्नेही बनण्याची संधी महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत बारामती परिमंडलामधील सोलापूर, सातारा जिल्ह्यासह बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, शिरूर व दौंड (जि. पुणे) या तालुक्‍यांतील सात हजार 847 वीजग्राहकांनी "गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे. 

सोलापूर ः वीजबिल किंवा पावतीच्या कागदाचा वापर बंद करून पर्यावरणस्नेही बनण्याची संधी महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत बारामती परिमंडलामधील सोलापूर, सातारा जिल्ह्यासह बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, शिरूर व दौंड (जि. पुणे) या तालुक्‍यांतील सात हजार 847 वीजग्राहकांनी "गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे. 

हेही वाचा ः ...तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील ः गडाख 

महावितरणने पर्यावरणपुरक योजना म्हणून छापील कागदाऐवजी "ई-मेल'चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात 10 रुपये सवलत दिली आहे. या योजनेमुळे वीजग्राहकांची वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल दरमहा "ई-मेल' तसेच "एसएमएस'द्वारे मिळणार असल्याने ते लगेचच ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. ज्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त बिल किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर असलेले वीजबिल डाऊनलोड व प्रिंट घेण्याची सोय आहे. विशेष म्हणजे ही वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत व ते रंगीत स्वरूपात देखील प्रिंट केले जाऊ शकते. सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या अकलूज विभागात 256, बार्शी 671, पंढरपूर-610, सोलापूर ग्रामीण- 532 आणि सोलापूर शहर विभागात 926 अशा एकूण दोन हजार 995 वीजग्राहकांनी "गो-ग्रीन'मधून वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी "ई-मेल' व "एसएमएस'ला पसंती दिली आहे. 

हेही वाचा ः सोलापूर झेडपीत कॉंग्रेसने का घेतली माघार? 

मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख 42 हजार वीजग्राहकांना "एसएमएस' द्वारे बिलाची रक्कम, देय तारखेचा तपशील, दरमहा वीजबिलाचा व वीजबिल भरण्याच्या मुदतीचा तपशील, मीटर रीडिंग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर आदींसह विविध स्वरूपाची माहिती निःशुल्क दिली जात आहे. वीजबिलासाठी ग्राहकांनी छापील कागदाऐवजी ईमेलचा पर्याय निवडल्यास त्यांचा पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागणार आहे व वीजबिलात दरवर्षी 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय महावितरणने "ऑनलाइन' बिल भरण्यासाठी 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट दिली आहे. क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबिट कार्ड, कॅश कार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून "ऑनलाइन'द्वारे होणारा वीजबिल भरणा निःशुल्क केला आहे. त्यामुळे छापीलऐवजी वीजबिलांचे व पावत्यांचे सॉफ्टकॉपीमध्ये जतन करणे सोयीचे होणार आहे. 
"गो-ग्रीन'चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ऍपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are so many consumers in Go-Green of Mahavitaran