सांगलीत आघाडीसाठी खल-बैठकांचे सत्र कायम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस बाकी आहेत. तरीही आघाडीचा निर्णय नाही. काही जागांवर अंतिम निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अधिकृत घोषणा नाही.

सांगली - महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत खल आणि स्वतंत्र बैठकांचे सत्र आजही सुरुच राहिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वत: दोन दिवस सांगलीत तळ ठोकून आहे. त्यांनी वैयक्तिकरित्या भेटी घेऊन पदाधिकारी आणि इच्छूक उमेदवारांशी चर्चा केली. तसेच काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांच्याशी त्यांची बैठक झाली. मात्र काही जागांवर दोन्हीकडील हट्ट कायम आहे. 

अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस बाकी आहेत. तरीही आघाडीचा निर्णय नाही. काही जागांवर अंतिम निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अधिकृत घोषणा नाही. वादातील तीन प्रभागाबरोबरच मिरजेतील आणखी काही प्रभागावरही खल सुरु आहे. नायकवडी पुन्हा तंबूत परतल्याने राष्ट्रवादीत उत्साह असला तरी त्यांनाच देण्यात येणाऱ्या जागेबाबत चर्चा सुरु आहे. आजही सकाळपासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे आदींची बैठक सुरु आहे. प्रत्येक जागेबाबत चर्चा होत आहे. 

गेल्या दोन दिवसात आमदार जयंत पाटील यांनी बैठकांचा धडाका लावून संपुर्ण माहिती घेतली आहे. अधिवेशनाला रवाना होण्यापुर्वी आघाडीबाबत अंतिम घोषणा ते करण्याची शक्‍यता आहे. काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांच्याशीही त्यांची चर्चा झाली आहे. पण आघाडीच्या अंतिम निर्णयाबाबत घोषणा केली नाही. राष्ट्रवादीने 35 जागांचा आग्रह धरल्याने अजून चर्चा होण्याची शक्‍यता आहे. आघाडीची घोषणा बुधवारीच होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि भाजपमध्ये जाणाऱ्यांचे दोर कापण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: There are some political movement at sangli for municipal election