सोलापूर एसटी स्थानकावर महिलांची लूट थांबली 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन  स्थानिक महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या संदर्भात "सकाळ'मध्ये घटनास्थळांवरील घडामोडींचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. 

सोलापूर : प्रसाधनगृहात जाण्यासाठी महिलांकडून घेण्यात येणारे पाच रुपयांचे शुल्क बंद करून त्या ठिकाणी प्रसाधनगृह मोफत असल्याच्या फलकाचे उद्‌घाटन  स्थानिक महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या संदर्भात "सकाळ'मध्ये घटनास्थळांवरील घडामोडींचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. 

सोलापूर एसटी स्थानकावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आहे. पुरुषांसाठी शुल्क तर महिला व 12 वर्षाखालील मुलांसाठी मोफत सेवा देण्याच्या अटीवर हे प्रसाधनगृह चालविण्यास देण्यात आले होते. मात्र मक्तेदाराच्या कर्मचारी महिलांकडून सरसकट पाच रुपये शुल्क घेत होते. हा प्रकार  सोमवारी उघडकीस आला. खुद्द परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्याच शहरात हा प्रकार होत असल्याने मोठ्या प्रमाणाता नाराजी व्यक्त करण्यात आली. 

प्रभागाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्याकडे या संदर्भात तक्रार आल्यावर त्यांनी स्थानक प्रमुख मुकुंद दळवी यांना जागेवर बोलावून घेतले आणि झालेल्या प्रकाराची माहिती दिली. श्री. दळवी यांनीही मक्तेदारांच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी पैसे घेत असल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे मंगळवारी या ठिकाणी महिलांसाठी मोफत सुविधा असलेला फलक लावण्यात आला. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची लूट थांबणार आहे. 

यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, विजय बमगोंडे, समाधान आवळे, तारासिंग राठोड, बाळासाहेब मोरे, रमेश चव्हाण, अविनाश मोरवंची, बाळासाहेब बाबरे, त्रिशुल निकंबे, शेखर शिरसागर, उस्मान शेख, मच्छिंद्र मसलखांब, राजू सोनवणे, राजू सुरवसे, उदय भोसले, सुभाष माळी, हरिदास लोंढे, जया काळे, मीना खंदारे, संगीता खंदारे, उमा माने, सुनिता पाटोळे, नंदा पाटोळे, शांताबाई जाधव, ताईबाई गायकवाड, नंदा कांबळे, शांताबाई भोसले, भंडारी, कल्पना वाघमारे उपस्थित होत्या. 

महिलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकाराची माहिती कार्यकर्त्यांनी दिली, तरी "सकाळ'ने वस्तुनिष्ठ आणि घटनास्थळी येऊन सविस्तर वृत्त दिले. त्यामुळे या ठिकाणी फलक लावण्याचा निर्णय एसटी महामंडळ प्रशासनाला घ्यावा लागला. 
- आनंद चंदनशिवे, नगरसेवक 

Web Title: there is free toilet in solapur st stand