मोहोळ तहसिल परिसरातील बंद हातपंपाने नागरीकांच्या घशाला कोरड

राजकुमार शहा 
रविवार, 20 मे 2018

सध्या मोहोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्या निमित्ताने अनेकजण येतात. सध्या कडक उन्हाळा आहे. मात्र हातपंप बंद असल्याने पाणी उपलब्ध होत नाही.

मोहोळ - तहसील कार्यालयाच्या आवारातील पाण्याचा हातपंप गेल्या महिन्याभरापासून बंद पडल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल सुरू आहेत. त्वरीत तो दुरुस्त करावा, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. 

तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच शहरातील सर्वात जुना हातपंप आहे. तहसील कार्यालय सेतू तसेच पंचायत समिती पोलिस ठाण्याच्या कामासाठी तालुक्याच्या विविध भागातून दररोज शेकडो महिला व नागरीक येतात. त्यांच्याबरोबर लहान मुलेही असतात. तहसील आवारात हॉटेल आहेत. पण तेही पाणी विकत घेतात. त्यामुळे सर्वसामान्याची मोठी अडचण होत आहे. 

सध्या मोहोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. त्या निमित्ताने अनेकजण येतात. सध्या कडक उन्हाळा आहे. मात्र हातपंप बंद असल्याने पाणी उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य व गरीबांना 15 ते 20 रुपये किमतीची पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पिणे शक्य नाही. तसेच तहसील आवारात एकच हातपंप असल्याने तो त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे. दरम्यान तहसील कार्यालयाजवळच ग्रामिण रूग्णालय आहे. त्या ठिकाणी काही रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत मात्र हातपंप बंद असल्याने त्यांच्या नातेवाईकांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: There is no water in handpump of Mohol Tehsil area