मंगळवेढा दुष्काळी छायेत; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

There is a possibility of drought in Mangaldera
There is a possibility of drought in Mangaldera

मंगळवेढा - पावसाने ओढ दिल्याने तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली सध्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावराचे हाल सुरू असल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन आ. भारत भालके यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले.

पावसाळ्यातील अंतीम दिवस आले तरी परतीचा पाऊस होणार याची आशा राहिली नाही या वर्षी सरासरीच्या कमी पाऊस झाल्याने तालुक्याच्या दक्षिण भागात पिण्याच्या आणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. चारा उपलब्ध नसल्याने पशुधन संकटात आहे. नदीकाठच्या हिरव्या चाय्रासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. या वर्षीच्या पावसाने ओढ दिल्याने हंगाम वाया गेला आहे गतवर्षीच्या खरिपाच्या नुकसानी बद्दल तालुक्यातील 53 हजार शेतकय्रांला विमा कंपनीने वाय्रावर सोडले.  आजही वंचिताना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही.

भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना अपूर्ण असुन संबंधितांना तात्काळ आदेश देवून सदर योजना सुरू करावी लागेल यासाठी प्रयत्न करावेत,
म्हैसाळ उपसा सिंचनच्या सहाव्या टप्प्यातील कामे जवळ पास पुर्ण होत आली आहेत जल्सेतू ची कामे पुर्ण झाली आहेत. यातील मुख्य काल्व्याच्या की मी 69.270 मधील  असलेल्या ओढ्यातील पाणी सोडल्यास तालुक्यातील चार साठवण तलावात पाणी येऊ शकते अशा प्रकारे पूर्वी सर्व्हे देखील केला आहे जर म्हैसाळ चे पाणी ओढ्याला सोडून या दक्षिण  भागातील लोकाना तलावात पाणी दिल्यास तात्पुरता पिण्याचा आणी जनावरांचा पाणी प्रश्न मार्गी लागू शकतो या बाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबधितांना आदेश द्यावेत अशी मागणी केली.

दरम्यान मुंबई येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष खा. संजय पाटील आ गणपतराव देशमुख आ सुमनताई पाटील आ विलासराव जगताप यांच्या समवेत आ, भारत भालके यानी जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेत म्हैसाळ उपसा सिंचन योजना लवकरात लवकर कार्यान्वीत व्हावी, अपूर्ण कामे पुर्ण करुन घोलेश्वर ओढ्याद्वारे तालुक्यातील साठवण तलावात पाणी सोडावे, अशी मागणी केली,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com