शंकरराव खरात यांचे जन्मभूमीत स्मारक व्हावे...यांची सरकारकडे मागणी 

नागेश गायकवाड 
Tuesday, 14 July 2020

आटपाडी (सांगली)-  माणदेशी माणसं सातासमुद्रापार नेणारे पाच साहित्यिक माणदेशी मातीत तयार झाले. त्यातीलच एक शंकरराव खरात. जन्मशताब्दिवर्षातही ते उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जन्मभूमी आटपाडीत राज्य सरकारने स्मारक उभारून गौरव करावा, अशी मागणी विलास खरात यांनी केली आहे. 

आटपाडी तालुक्‍यातील पाच थोर साहित्यिकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. शंकरराव खरात यांचाही त्यात समावेश आहे. त्यांचे "तराळ अंतराळ' हे आत्मकथन देश विदेशात पोहोचले. राष्ट्रपतींनी देखील त्यांचा गौरव केला. जळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. 

ज्यांना देशविदेशातील लोकांनी डोक्‍यावर घेतले, ज्यांचं कार्य कर्तृत्व आभाळाला गवसणी घालणारं ठरलं. ते वंचित समाजातुन आलेले. त्यांच्या साहित्याला त्याचा चटका बसला. प्रस्थापित व्यवस्थेने त्यांचे साहित्य पुढे येऊ दिले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते काही काळ कुलगुरूही होते. आटपाडीत त्यांचा कोणताही गौरव झाला नाही. आटपाडी तालुक्‍यात त्यांचे भव्य स्मारक शासनाने करावे, अशी मागणी विलास खरात यांनी केली आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There should be a memorial in the birthplace of Shankarrao Kharat