भरउन्हात प्रकल्पग्रस्तांचे उनखेड येथे उपोषण सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मूर्तिजापूर : तालुक्यातील उनखेड येथे वाई संग्राहक प्रकल्पग्रस्तांचे सहाव्या दिवशीही साखळी उपोषण सुरू आहे. सुर्य आग अोकत असतानाही प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला. भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना व पारदर्शकता अधिनियम २०१३ (कायदा क्र.३०) अनुदान एकमुस्त रक्कम रुपये पाच लाख मिळण्यात यावे.

वाई संग्राहक प्रकल्पअंतर्गत सन २०११ ते २०१२ मध्ये झालेल्या सरळ सेवा पद्धतीने जी जमीनची खरेदी करण्यात आली. त्याचा योग्य मोबदला मिळावा. उर्वरित जमिनीची कायमस्वरूपी शेत रस्ते करुन देणे, भिंतीचे पक्के बांधकाम करून देणे, प्रकल्पग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या उर्वरीत जमिनीची तात्काळ शासकिय मोजणी करुन देणे यांसारख्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पस्थळी बेमुदत साखळी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी,राजु वानखडे यांच्या प्रगती शेतकरी मंडळांनी,शेतकरी जागर मंचाने जाहिर पाठिंबा दिला. तसेच वाई संग्राहक प्रकल्पाचे कंत्राटदार.अनुप सिंगजी यांनी काल उपोषणकर्त्यांना भेट देऊन काम सुरू करण्याची विनंती केली.

या आंदोलनात रंभापूर गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रशांत इंगळे, सामाजिक कार्यकर्ते श्याम टिपरे, जीवन घोरमोडे, पोलिस पाटील राजू टिपरे, साहेबराव इंगळे, वैभव टिपरे, सुरेश वानखडे, गुलाबराव इंगळे, नितीन बंगाले,धम्मपाल वानखडे,नितीन घोरमोडे,शरद इंगळे,हर्षल इंगळे,उमेश काकोडे,आकाश काकोडे,दिलीप वानखडे,सुभाष वानखडे,पप्पु वानखडे,प्रल्हाद घोरमोडे,गोपी इंगळे,विजय इंगळे,बंडु इंगळे,प्रभाकर घोरमोडे उपस्थित होते.

Web Title: there was a hunger strike in Unkhed