छिंदमच्या प्रवेशाने नगर मनपात गदारोळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नगर - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द उच्चारल्याने सर्वांच्या रोषाचे कारण बनलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महापालिका सभागृहात पोचल्याने प्रचंड गदारोळ झाला. सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. घोषणाबाजी सुरू असतानाच छिंदमने हजेरी रजिस्टरवर सही करत त्याची भूमिका असलेले निवेदन महापौर सुरेखा कदम यांना दिले. दरम्यान, छिंदमच्या प्रवेशाने महापालिका सभागृह अपवित्र झाल्याचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व मनसेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

नगर - छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द उच्चारल्याने सर्वांच्या रोषाचे कारण बनलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आज महापालिका सभागृहात पोचल्याने प्रचंड गदारोळ झाला. सभागृहातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. घोषणाबाजी सुरू असतानाच छिंदमने हजेरी रजिस्टरवर सही करत त्याची भूमिका असलेले निवेदन महापौर सुरेखा कदम यांना दिले. दरम्यान, छिंदमच्या प्रवेशाने महापालिका सभागृह अपवित्र झाल्याचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व मनसेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दरम्यान, ‘त्याचे निवेदन स्वीकारलेच कसे?’ अशी आक्रमक सदस्यांनी भूमिका मांडली.

Web Title: There was tremendous confusion in the municipal hall due to Shripad Chindam