
Sangli : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. प्रभाग रचना करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सन २०१७ मध्ये असलेल्या ६० जागांच्या तुलनेत यंदा एक जागा वाढली आहे. खानापूर मतदारसंघात एक गट आणि दोन गणांची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ६१ जागांसाठी प्रारूप प्रभाग रचना १४ जुलैपर्यंत प्रसिद्ध होणार आहे.