कऱ्हाड: बसस्थानकात महिलेचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

पोलिसांनी सांगितले की, जाधव कामानिमित्त मुनावळे येथून कोरेगावला जाण्यासाठी येथील स्थानकात आल्या होत्या. त्या बसची वाट पाहत होत्या. त्यांच्या हातात कॅरी बॅग होती. त्यात सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स होता.

कऱ्हाड : बसस्थानकात एसटीबसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवून महिलेचे सुमारे एक लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. आज दुपारी चारच्या सुमारास घटना घडली. त्याबाबत अनीता जाधव (रा. नेरूळ, मुंबई) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, जाधव कामानिमित्त मुनावळे येथून कोरेगावला जाण्यासाठी येथील स्थानकात आल्या होत्या. त्या बसची वाट पाहत होत्या. त्यांच्या हातात कॅरी बॅग होती. त्यात सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स होता.

कोरेगावला जाण्यासाठी एसटी आली त्या बसमध्ये जात असताना गर्दी होती. त्याचा फायदा घेवून चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील सोन्याचा बॉक्स लंपास केला. त्यात साडेचार तोळ्याचे सोन्याचे गंठण, बारा ग्रॅमची सोनसाखळी, सोन्याची नथ असे दागिने होते. तेच चोरट्य़ांने लंपास केले. त्याबाबत सौ. जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

Web Title: thief in Karhad

टॅग्स