सराफाच्या दुकानात पती-पत्नीचा चोरीचा प्रयत्न!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

राजेंद्र हणमंतु गायकवाड व चंद्रकला राजेंद्र गायकवाड (रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नितीन सुरेश वेर्णेकर (वय 23, रा. मुकुंदनगर भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

सोलापूर : सराफ बाजारातील वारद कॉम्पलेक्‍समधील दुकानातून आठ हजारांची सोनसाखळी चोरणाऱ्या पती-पत्नीला सराफाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोघांवर जोडभावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

राजेंद्र हणमंतु गायकवाड व चंद्रकला राजेंद्र गायकवाड (रा. विजापूर नाका झोपडपट्टी, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नितीन सुरेश वेर्णेकर (वय 23, रा. मुकुंदनगर भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास वेर्णेकर यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने गायकवाड पती-पत्नी आले. त्यांनी सोनसाखळी दाखवण्यासाठी सांगितले.

दोघांना वेगवेगळ्या आकाराच्या सोनसाखळ्या दाखवल्या. सोनसाखळी पसंद नसल्याने दोघेही दुकानातून बाहेर गेले. त्यानंतर वेर्णेकर यांनी सोनसाखळीचे वजन केले. वजन कमी असल्याने त्यांनी गायकवाड पती-पत्नीकडे चौकशी केली. राजेंद्र गायकवाड हा शर्टामध्ये सोनसाखळी लपवून घेऊन जात असताना सापडला. वेर्णेकर यांनी दोघांना ताब्यात घेऊन जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात नेले. त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: thief in Solapur