रमल्‍या लग्नातील फोटोसेशनला, गेले दहा तोळे सोने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

लग्न झाल्यावर शहा यांच्या पत्नीने सुखेंदू दोशी यांच्याकडे पर्स दिली होती. काही वेळाने दोशी ओळखीच्या पाहुण्यांचा फोटो मोबाईलवर काढण्यासाठी गेले. फोटो काढत असताना दोशी यांनी पर्स तेथेच बाजूला असलेल्या साऊंड सिस्टिमवर ठेवली. 

कऱ्हाड (जि. सातारा) : लग्नानंतर फोटो काढण्यास स्टेजवर गेल्यावर शेजारीच असलेल्या साऊंड सिस्टिमवर ठेवलेल्या पर्ससह त्यातील दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. सुखेंदू छोटालाल दोशी (वय 51, रा. राशीन, ता. कर्जत, जि. नगर) यांनी त्याबाबतची फिर्याद दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. 

हे वाचा - मोदींची डिग्री कोणत्‍या विद्यापीठाची

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुखेंदू दोशी यांच्या मुलीचे दीर अक्षय शहा यांचे लग्न 20 जानेवारीला पंकज मल्टिपर्पज हॉलमध्ये होते. दोशी यांची मुलगी प्रांजल हिने तिच्याकडील सोन्याचे दागिने पर्समध्ये घालून दोशी यांच्या पत्नीकडे ठेवण्यासाठी दिले. लग्न झाल्यावर शहा यांच्या पत्नीने सुखेंदू दोशी यांच्याकडे पर्स दिली होती. काही वेळाने दोशी ओळखीच्या पाहुण्यांचा फोटो मोबाईलवर काढण्यासाठी गेले. फोटो काढत असताना दोशी यांनी पर्स तेथेच बाजूला असलेल्या साऊंड सिस्टिमवर ठेवली. 

आणखी वाचा - म्‍हणून अल्‍पवयीन प्रियकर, मुलीने केला बापाचा खून

फोटो काढून काही वेळानंतर ती पर्स तेथून गायब झाल्याचे दोशी यांच्या लक्षात आले. त्यांनी इतरत्र शोध घेतला. मात्र, पर्स व त्यामधील दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोकड असा दोन लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. त्याची फिर्याद दोशी यांनी आज शहर पोलिसांत दिली. त्यावरून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Thief Stole 100 Grams Of Gold At Karad