सलग तिसऱ्या दिवशी वाहनधारकांनी पेटवली रस्त्यावर चूल

अश्फाक बागवान
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

- भीमा नदीवरील बेगमपूर पुलावर पाच फुटापेक्षा अधिक पाणी असल्यामुळे सोलापूर हुन कोल्हापूर कडे जाणारी वाहतुक गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे.

- त्यामुळे अवजड वाहने रस्त्यावर उभी असून वाहनधारकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

- त्यांना भर रस्त्यावर सलग तिसर्या दिवशी चूल पेटवण्याची वेळ आली.

बेगमपूर : भीमा नदीवरील बेगमपूर पुलावर पाच फुटापेक्षा अधिक पाणी असल्यामुळे सोलापूर हुन कोल्हापूर कडे जाणारी वाहतुक गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे अवजड वाहने रस्त्यावर उभी असून वाहनधारकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना भर रस्त्यावर सलग तिसर्या दिवशी चूल पेटवण्याची वेळ आली.

पुराच्या पाण्यामुळे या भागासह अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठची शेती आणि भाजीपालासुद्धा पाण्यात गेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असताना दुध, भाजीपाला या नाशवंत पदार्थांची वेळेत पोहच होत नसल्यामुळे या पदार्थांचे काय करायचे असा प्रश्न देखील पशुपालकासह शेतकय्रासमोर उभा आहे.

त्याचबरोबर वाहन भाड्यातून दोन पैसे उत्पन्न मिळणाऱ्या वाहनधारकांना माल संबंधितांना वेळेत पोहोचवयाचे असताना, त्याना पुराने अडचणीत आणले आहे. त्यामुळे वाहन कर्जाचा मासीक हप्ता भरण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. भीमा नदीत सोडलेल्या पुराच्या पाण्यामुळे, त्यांनी रस्त्यावर मालासह वाहन सोडून दूर जावे तर मालाची सुरक्षितता कोण करणार म्हणून या संकटसमयी तिथेच थांबावे लागले. त्यासाठी पाणी कधी ओसरणार याची वाट ते पाहत आहेत. तर पोटासाठी मात्र रस्त्यावर चूल पेटवण्याची वेळ आली. परराज्यातील वाहनधारकांना भाषेमुळे अडचणीबाबत स्थानिक पातळीवर संपर्क साधताना मदत होत नसल्यामुळे त्यांना पोटासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे या वाहनधारकांनी बोलून दाखविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on third consecutive day truck drivers lit their stove on road