हातात त्रिशूल, नागफणी अन् कमळ.. नेर्लेत हजार वर्षांपूर्वीची शिव-पार्वती मूर्ती; गावकऱ्यांनी जपला अमूल्य ठेवा

Bhairavnath Jogeshwari Temple : उजव्या हातात त्रिशूल, तर खालच्या उजव्या हातात कमळ आहे. डाव्या हातात नागफणी आहे.
Bhairavnath Jogeshwari Temple
Bhairavnath Jogeshwari Templeesakal
Updated on: 
Summary

महिषासुरमर्दिनीची दुसरी मूर्ती प्राचीन काळातील आहे. मूर्ती चतुर्भुज आहे. तलवार, त्रिशूल पाहण्यासारखे आहे.

नेर्ले : वाळवा तालुक्यातील येथील ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात (Bhairavnath Jogeshwari Temple) शिव-पार्वती मूर्ती (Shiva-Parvati idol) आहेत. संशोधनातून या मूर्ती एक हजारांहून अधिक वर्षांपूर्वीच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मूर्तीची पूजा येथेच होतेय. प्राचीनत्व व शिवमूर्ती पूजा हा नेर्लेकरांच्या दृष्टीने अमूल्य ठेवा ठरला आहे. इतिहास संशोधक संजय पाटील व विक्रम पाटील यांनी संशोधन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com