"आमराई'साठी सरसावले हजारो हात 

aamrai
aamrai

सांगली : सांगलीचे हरीत वैभव असलेल्या आमराईच्या समृध्दीसाठी आज शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फृर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात हातभार लावला. ही मोहिम सातत्याने सुरु ठेवण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त मौसमी बर्डे यांनी आज व्यक्त केला. 

पूर्वनियोजनाप्रमाणे कोणी कोणते काम करायचे याचे काटेकोर नियोजन आधीच केले होते. त्यानुसार कामाचे टोकन वाटप प्रवेशद्वारावर सुरु होते. स्वयंसेवक, कर्मचारी, अधिकारी , व्यक्ती, संस्था यांनी एकाच वेळी सर्व आमराईत नियोजनपूर्वक निश्‍चित ठिकाणी जाऊन श्रमदान केले. आभाळमाया, क्रिडाई, जैन सोशल ग्रुप, आयएमए अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी मोहिमेत सहभागी झाले. 

1846 मध्ये तयार झालेले संस्थांनी काळातील आमराई उद्यान आजही दिमाखात उभे आहे. म्हणजेच याला 173 वर्षे पूर्ण होत आहेत. सन 1985 मध्ये येथील झाडांची मोजदाद करण्यात आली होती. तेव्हा सव्वाशे जातींचे वृक्ष आमराईत असल्याचे नमूद झाले होते. त्यामध्ये चिंच, गोरखचिंच, चंदन, मोहोगनी, टेंभुर्णी, बेलगामवट, केशिया, रिठा, चेंडूफुल, भद्रलता, राचण, खडशिरणी, कदंब, रुद्राक्ष, सोनचाफा, नागचाफा, नागकेशर, पांगारा, शिसम, अशोक अशा अनेक दूर्मिळ जातींच्या वृक्षांचा समावेश आढळलेला दिसून येतो. पूर्वी आमराईत चंदनाची ही विपुल झाडे होती. कालांतराने सदर वृक्ष कमी होत गेले. मात्र अलीकडे जागरुक निसर्गप्रेमी लोकांमुळे मूळच्या दुर्मिळ वृक्षांची रोपे लावणे, नवीन जातींची लागवड करणे अशा गोष्टींकडे त्यांचे लक्ष गेले आहे ही एक समाधानाची गोष्ट आहे. दक्षिण महाराष्ट्रातील बोटॅनिकल गार्डन म्हणून आमराईची ओळख तयार व्हावी असा निर्धार उपायुक्त बर्डे यांनी व्यक्त केला. 

त्या म्हणाल्या, "आज सध्याची रोपे जगवण्यासाठी कामे झाली. मात्र येथील जागेची उपलब्धता पाहता त्याठिकाणी अजूनही मोठया प्रमाणामध्ये दूर्मिळ वृक्षांची लागवड होऊ शकते. इथे लोक फिरण्यासाठी व व्यायामासाठी येतात त्यांच्यात इथल्या झाडांबद्दल आस्था व्हावी. त्याची जबाबदारी त्यांनीच घ्यावी असे नियोजन करून आमराई समृध्द केली जाईल.'' 
दरम्यान आज नागरिक तसेच संस्थांनी झाडाभोवती आले करणे, खत घालणे ,पाणी देणे अशी अनेक कामे नागरिकांनी जबाबदारीने पार पाडली. उद्यान अधीक्षक कोरे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी या मोहिमेत भाग घेतला.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com