सोलापूर - तोतया पत्रकाराकडून आश्रमशाळेला धमकी

बाबासाहेब शिंदे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पांगरी (सोलापूर) - मुलाला शाळेत प्रवेश दिला नाही तर, दोन वर्षापुर्वी शेततळ्यात पोहण्यास गेलेल्या मुलाच्या मृत्यू प्रकरण उकरून काढून शाळेविरूदध आंदोलन करेन. अशी धमकी देत, हे प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याची घटना (ता.8) बुधवारी खामगाव (ता.बार्शी) येथील आश्रम शाळेत घडली. मी पत्रकार व भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचा सदस्य आहे असे सांगणारा तोतया पत्रकार केशव लोखंडे (रा.अकलुज) यांच्यावर पांगरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत खामगाव आश्रमशाळेचे संस्थापक प्रभाकर गणपत डमरे (रा.खामगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहेत की, शुक्रवारी प्राथमिक आश्रम शाळा चालू असताना मुख्याध्यापक दिलीप तांबडे यांना केशव लोखंडे नावाचा व्यक्ती येऊन मुलास सहावीच्या वर्गात प्रवेश द्या. त्यावेळी दोन महिन्यांचा कालवधी झाला आहे. आता प्रवेश देता येत नाही असे म्हटल्यावर केशव लोखंडे यांनी मी पत्रकार व भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचा सदस्य आहे. दोन वर्षांपूर्वी मयत झालेल्या मुलांचे प्रकरण उचलून काढून संस्थेची बदनामी करीन, उपोषणास बसेन आणि तुम्ही जर एक लाख रूपये दिले तर प्रकरण दाबून ठेवीन असे म्हणून दमदाटी केली. 

त्यानंतर (ता.8) बुधवारी सकाळी प्रभाकर डमरे यांच्या मोबाईल नंबरच्या हॉटसअप वरती यापुर्वी आंदोलन केलेल्या दोन व्हिडिओ क्लीप पाठविल्या. त्यानंतर केशव लोखंडे यांनी दहा वाजेच्या सुमारास मोबाईलवर फोन करून तुम्हाला आंदोलनाच्या दोन क्लीप पाठविल्या आहेत. यावरून मुलांचे प्रकरण मिळवून घेण्यासाठी लाख रूपये द्या नाही तर मी समाज कल्याण ऑफिससमोर आंदोलन करून शाळा बंद पाडण्याची धमकी दिली आहे.

याबाबत पांगरी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष बडे करत आहेत.

Web Title: The threat from the journalist to ashram school