पावसामुळे रस्ता ओला झाल्याने तीन अपघात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

उंब्रज (सातारा) - पावसानंतर ओल्या झालेल्या महामार्गावर वाहन घसरून झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एकजण ठार झाला. चौघे जखमी आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. अपघातात सहा वाहनांचे नुकसान झाले. इंदोली येथील फाट्यावर दुपारी तिनच्या सुमारास अपघात झाला. 

बाळू आनंदा बडे (वय ४९ रा. नेरे ता. भोर) यांचा अपघातात मृत्यु झाला. अंकुश बाबूराव बडे (५८), दिपक आनंदा बडे (४६), मंगल सतिश बडे (२८), श्वेता विक्रम पवार (१८, सर्व रा. नेरे ता. भोर) असी जखमींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा ते कऱ्हाडच्या लेनवर पीक अप जीपमधून बडे कुटूंबिंय (एम. एच. १२ एलटी. ६५७२) पाटण येथे देवदर्शनास निघाले होती. यावेळी चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी जीप दोनदा पलटी झाली. त्यात बाळू बडे जागीच ठार झाले. अन्य चौघे जखमी आहेत. दुसऱ्या अपघातात डंपरने (एम.एच. ११ सीएच.२१२८) गॅस टॅकरला धडक दिली. त्यामुळे गॅसची गळती सुरू झाली. धडकेत डंपर महामार्गाच्या डिव्हायडरला धडकला. गॅस गळती लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने उपाय करून पोलिसांना बोलावले. तिसरा अपघात रिकाम्या गॅस टॅंकरचा (जी.जे.१२ एक्स. २१७१) झाला. त्या टॅंकरने चारचाकी ऑडी कारला (एम. एच. १४ डीएक्स १) पाठीमागून जोराची धडक दिली. ती कार ती स्वीफ्ट कारवर (एम एच. १२ जीसी. ४५५४) आदळली. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. 

पोलीस निरीक्षक ज्येतिराम गुंजवटे, सहायक पोलिस, निरिक्षक बजरंग कापसे व अऩ्य पोलिस घटनास्थळी आले. गॅस गळतीचे गांभीर्य ओळखून आवश्यक ती उपाययोजना केली. अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, महामार्ग पोलिस व देखभाल विभागाचे कर्मचारी आले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम उंब्रज पोलिसात सुरू होते.

Web Title: Three accidents due to rain