धक्कादायक; गाळ्याला बाहेरून कुलूप; आत चालायचे अश्‍लील चाळे  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

three couple arrested for pornography in kolhapur shivaji stadium

कोल्हापूर  येथील शिवाजी स्टेडियमच्या एका गाळ्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गाळ्यात काही जोडप्यांचे अश्‍लील चाळे सुरू असाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्यांना या गाळ्यात काही वेळासाठी सोडून बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. 

धक्कादायक; गाळ्याला बाहेरून कुलूप; आत चालायचे अश्‍लील चाळे 

कोल्हापूर - येथील शिवाजी स्टेडियमच्या एका गाळ्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गाळ्यात काही जोडप्यांचे अश्‍लील चाळे सुरू असाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्यांना या गाळ्यात काही वेळासाठी सोडून बाहेरून कुलूप लावण्यात येत असे. राजवाडा पोलिस ठाण्यात याबाबत कारवाई सुरू होती. 

हे पण वाचा - ब्रेकिंग : कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी; तरूण शेतकऱ्याची आत्महत्या 

याबाबत अधिक माहिती अशी- शिवाजी स्टेडियममधील एका गाळ्यात कोल्ड्रिंक हाऊस होते. त्यामध्ये मुले-मुली अश्‍लील प्रकार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी ते कोल्ड्रिंक हाऊस बंद करायला लावले होते; परंतु हे कोल्ड्रिंक हाऊस बंद केल्यापासून तेथे जोडप्यांना काही वेळासाठी आत सोडून बाहेरून कुलूप लावण्यात येत होते. शेजारील काही गाळेधारकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. तरीही येथे हा प्रकार सुरूच होता. आजही (ता. 21) या गाळ्यात काही जोडप्यांना सोडून बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. गाळ्यात त्यांचे अश्‍लील चाळे सुरू असतानाच स्थानिकांनी राजवाडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता या गाळ्यात तीन मुले आणि तीन मुली अश्‍लील चाळे करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. गाळा मालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. या गाळ्यात आक्षेपाहायर् पाकिटे सापडली आहेत. या प्रकरणी राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे. 

हे पण वाचा - तिच्या हाती सोळा जनावरांची दावी

टॅग्स :Kolhapur