मंगळवेढा मार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

राजकुमार शहा 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

दोन्ही वाहने इंचगाव शिवारात येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यात वरील तिघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.

मोहोळ : मोटार सायकल व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पती पत्नी व त्यांची नात असा तिघांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात आज दुपारी साडेतीन वाजता बेगमपूर ते मंगळवेढा मार्गावरील इंचगाव शिवारात झाला.

सदाशिव अंबादास गुंड (55) कमल सदाशिव गुंड (48) व आरती अमोल गुंड (6) तिघेही रा. शिवणी ता. उतर सोलापूर अशी अपघात मृत झालेल्यांची नावे आहेत. कामती पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, गुंड पती पत्नी मोटार सायकल क्र. एम. एच. 13/ ए एम 7776 वरून बेगमपूर हून मंगळवेढयाकडे निघाले होते. तर मालट्रक क्र. एम. एच. 20 ए. टी. 3900 ही विरूद्द दिशेने येत होती. दोन्ही वाहने इंचगाव शिवारात येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली. त्यात वरील तिघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले.
 
अपघाताची माहिती मिळताच कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे व अपघात पथकाने घटना स्थळाला भेट दिली. 
या अपघाताची फिर्याद संतोष चंद्रसेन गुंड रा. शिवनी यांनी कामती पोलिस ठाण्यात दिली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three died in mangalvedha road accident