तीन डॉक्‍टर, एजंटला घेतले ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मिरज - म्हैसाळमधील भ्रूणहत्याप्रकरणी आज पोलिसांनी आणखी तीन डॉक्‍टरांसह एजंटाला कर्नाटकातून अटक केली. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलिस निरीक्षक आणि एक सहायक पोलिस निरीक्षक करत आहेत. डॉक्‍टरांनी वापरलेली औषधे आणि अन्य तांत्रिक माहिती देण्यासाठी औषध प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास यंत्रणाही तितकीच सक्षम बनवण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी अटक केलेल्या डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर (वय 58, रा. विजापूर) आणि औषध विक्रेता सुनील काशिनाथ खेडेकर (वय 35 रा.

मिरज - म्हैसाळमधील भ्रूणहत्याप्रकरणी आज पोलिसांनी आणखी तीन डॉक्‍टरांसह एजंटाला कर्नाटकातून अटक केली. या गंभीर प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलिस निरीक्षक आणि एक सहायक पोलिस निरीक्षक करत आहेत. डॉक्‍टरांनी वापरलेली औषधे आणि अन्य तांत्रिक माहिती देण्यासाठी औषध प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपास यंत्रणाही तितकीच सक्षम बनवण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी अटक केलेल्या डॉ. रमेश व्यंकटेश देवगीकर (वय 58, रा. विजापूर) आणि औषध विक्रेता सुनील काशिनाथ खेडेकर (वय 35 रा. माधवनगर) या दोघांना 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. 

आठवडाभरापासून राज्यभर चर्चेत असलेल्या भ्रूणहत्याकांडाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी नव्याने पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तपासात कोठेही त्रुटी राहू नयेत या उद्देशाने तपास अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. वेगवेगळे पोलिस अधिकारी, कर्मचारी संयुक्तपणे तपास करत आहेत. महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, मिरज शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, विश्रामबागचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे आणि कुपवाड पोलिस ठाण्याचे अशोक भवड यांचाही तपास पथकात नव्याने समावेश करण्यात आला. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत शिंदे तपासात सक्रिय आहेतच. पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांचे तपासावर लक्ष आहे. आज दिवसभरात या सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने कर्नाटकातून आणखी चौघांना ताब्यात घेतले. यामधे तीन डॉक्‍टर आणि एका एजंटाचा समावेश आहे. या चौघांकडेही आज सायंकाळपासून स्वतंत्रपणे चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांना मदत करण्यासाठी आज औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचेही पथक मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दिवसभर थांबून होते. या पथकांकडून पोलिसांनी डॉ. खिद्रापुरेच्या दवाखान्यात आणि औषध दुकानात सापडलेली औषधांची माहिती घेतली. डॉ. खिद्रापुरेच्या हॉस्पिटलमधील सगळेच व्यवहार संशयास्पद असल्याचे औषध प्रशासनाने निदर्शनास आणून दिले. या दुकानाचा परवाना म्हैसाळमधील सुप्रिया आनंदा पाटील यांच्या नावावर आहे. डॉ. खिद्रापुरे याने त्यांच्याशी भागीदारी केली. गर्भपातासाठी लागणारी सगळी औषधे परस्परच विकत आणली. यापैकी बहुसंख्य औषधे ही बिलाशिवाय लेखी व्यवहार टाळून मागविण्यात आली आहेत. त्यामुळे याच्या खोलवर तपासातून औषधांच्या बेकायदेशीर विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार आहे. 

पोलिसांच्या तपासात अधिकाधिक वैद्यकीय पुरावे मिळवण्यासाठी आरोग्य विभागाशीही पोलिसांनी योग्य समन्वय ठेवला आहे. रुग्णालयातील नोंदी, औषधे, शस्त्रे आणि अन्य साहित्यासह प्रत्येक बाबीची खातरजमा करण्यासह ठोस पुराव्यांची जोड देण्यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.

Web Title: three doctors arrested