जिल्ह्यातील तीनशे वैद्यकीय केंद्राची तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

सांगली - राज्य सरकारने आज सोनोग्राफी मशीन यांची तपासणी करण्याचा नवा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील केंद्रांची तपासणी करण्याबाबत उद्या (ता. 15) जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, म्हैसाळ येथील भ्रूणहत्याकांडानंतर आरोग्य विभागाच्या वतीने चार दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय केंद्र तपासणी मोहिमेत आतापर्यंत तीनशे वैद्यकीय केंद्राची तपासणी पूर्ण झाली आहे. 

म्हैसाळमध्ये डॉ. खिद्रापुरे यांच्या रुग्णालयात स्वाती जमदाडे या विवाहितेचा बेकायदा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. यानंतर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भविष्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी रुग्णालये तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनोंदणीकृत रुग्णालये, नर्सिंग होम, गर्भपात केंद्रे, सोनोग्राफी केंद्र यांची तपासणी करण्यात येत आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर एक याप्रमाणे जिल्ह्यात दहा आणि महापालिका क्षेत्रात एक अशी एकूण अकरा पथके स्थापन करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभाग, महसूल, पोलिस यांचे प्रतिनिधी आहेत. 

जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय केंद्राची तपासणी करून पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे बंधन समितीवर आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून वैद्यकीय केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. आजवर तीनशे केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. 

Web Title: Three hundred medical examination center in the district checking