Vidhan Sabha 2019 मतदानासाठी गावी निघालेले साताऱ्याचे तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

या अपघातामधील जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पवना पोलिस चौकीनजीक सोमवारी (ता.२१) पहाटे बसने ट्रकला ठोकरल्याने झालेल्या भीषण अपघातात मतदानासाठी निघालेले साताऱ्याचे तिघे जण मृत्यूमुखी पडले. तर २५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.
 
सयाजी पांडुरंग पाटील (वय-६०), संभाजी शिवाजी पाटील (वय- ४५, वझोळी, पाटण, जि. सातारा), मोहनकुमार शेट्टी (वय- ४२, रा. वांगणी, बदलापूर) अशी मृतांची नावे आहेत.

द्रुतगती मार्गावरील उतार व वळणावर  पहाटेच्या सुमारास चालकास डुलकी लागल्याने बसने उभ्या वाहनांना मागून ठोकरल्याने हे दोन्ही अपघात झाले असण्याची शक्यता वाहतुक पोलिसांनी व्यक्त केली. अपघातग्रस्तांवर ओझरडे येथील ट्रामा सेंटर व सोमटने येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed, 3 injured in road accident while travelling for voting