आष्टा येथे तीन लाखाची सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त : मिसाळवाडीतील एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

आष्टा (सांगली) -  येथील आष्टा ते तासगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून रिक्षातील तीन लाखाची सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला. याप्रकरणी रिक्षा चालक राजू बाशेखान रोडे (वय 40, मिसाळवाडी, आष्टा, ता. वाळवा) यास अटक केली. 

आष्टा (सांगली) -  येथील आष्टा ते तासगाव रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून रिक्षातील तीन लाखाची सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला. याप्रकरणी रिक्षा चालक राजू बाशेखान रोडे (वय 40, मिसाळवाडी, आष्टा, ता. वाळवा) यास अटक केली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अवैध्य धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. हे पथक आज इस्लामपुर विभागात पेट्रोलींग करीत असताना सहाय्यक फौजदार मारुती सांळुखे यांना आष्टा ते तासगाव रस्त्यावर एका ऍपे रिक्षामधून सुंगधी तंबाखु व गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ आष्टा ते तासगाव रस्त्यावर तत्काळ सापळा रचला. काही वेळातच ऍपे रिक्षा (एमएच 10 सीक्‍यु 301) तेथे आली. रिक्ष थांबवून चालकाची चौकशी केल्यानंतर त्याचे नाव राजु रोडे असे सागितले. रिक्षाची तपासणी केल्यानंतर आतमध्ये सुंगधी तंबाखु, गुटखा सुपारी असलेली 12 पोती, आरएमडी पानमसाला 2 बॉक्‍स, सुंगधी तंबाखू गोल्डचे दोन बॉक्‍स असा 3 लाख 3 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल मिळाला. सुगंधी तंबाखू, गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरेली रिक्षा असा 3 लाख 88 हजार 600 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

मुद्देमालाचा पंचनामा करून आष्टा पोलीस ठाण्यात रोडे आणि मुद्देमाल देण्यात आला. आष्टा पोलिसांनी रोडेवर गुन्हा दाखल केला आहे. आष्टा पोलिस पुढील तपास करत आहेत. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शानाखाली मारुती सांळुखे, सुनिल चौधरी, गजानन घस्ते, कुबेर खोत, सुप्रिया साळुखे, शुभांगी मुळीक, उर्मिला खोत यांनी ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakh gutkha seized at Ashta: One arrested in Misalwadi