गडचिरोलीच्या चुकलेल्या तीन युवतीं पोलिसांमुळे सुखरूप पोहचल्या घरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कोल्हापूर - गडचिरोलीतील दुर्गम भागातील तीन युवती कुटुंबाचा चरितार्थाचे ओझे डोक्‍यावर घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडल्या. त्या नागपूरला गेल्या. तेथे नोकरीसाठी त्यांनी प्रयत्नही केले. त्या रेल्वेत बसल्या. मात्र नकळत त्या थेट कोल्हापुरात आल्या. अनोळखे शहर पाहून त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. स्टेशनवरच त्यांना रडू कोसळले. हे शाहूपुरी पोलिसांच्या नजरेस पडले. विचारणा केल्यावर त्यांना त्या गडचिरोलीतील असल्याचे समजले. तशा पोलिसांच्या भुवय्या उंचवल्या.

कोल्हापूर - गडचिरोलीतील दुर्गम भागातील तीन युवती कुटुंबाचा चरितार्थाचे ओझे डोक्‍यावर घेऊन नोकरीच्या शोधात बाहेर पडल्या. त्या नागपूरला गेल्या. तेथे नोकरीसाठी त्यांनी प्रयत्नही केले. त्या रेल्वेत बसल्या. मात्र नकळत त्या थेट कोल्हापुरात आल्या. अनोळखे शहर पाहून त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. स्टेशनवरच त्यांना रडू कोसळले. हे शाहूपुरी पोलिसांच्या नजरेस पडले. विचारणा केल्यावर त्यांना त्या गडचिरोलीतील असल्याचे समजले. तशा पोलिसांच्या भुवय्या उंचवल्या.

पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी त्या युवतींचा पत्ता, नातेवाईक याबाबतची चौकशी करून खात्री करून घेतली. अखेरीस तीन दिवसानंतर त्या तिघांनी त्यांच्या नातेवाईकांच्या सुखरूप स्वाधिन केले. 

गडचिरोली येथील माळंदा हे गाव अत्यंत दुर्गम आहे. या गावात निकीता पदा (वय 18), नम्रता पदा (वय 17) आणि रागिनी गावडे (वय 18) या तीन युवती राहतात. घरची अत्यंत बेताची परिस्थिती. गावकऱ्यांना मोबाईल तर सोडाच साध्या फोनचीही तोंडओळख नाही. घरच्यांना काहीतरी हातभार लावायचा. त्यासाठी नोकरी करायची असे या तिघांनी ठरवले. नोकरी शोधण्यासाठी त्या नागपूरला गेल्या. तेथे एक दोन ठिकाणी प्रयत्न केले. त्यानंतर त्या पुन्हा गावी जाण्यासाठी नागपूर-कोल्हापूर एक्‍सप्रेसला बसला. नकळत त्या तिघी 13 जुलैला कोल्हापुरातील रेल्वे स्टेशनवर दाखल झाल्या.

नवे शहर पाहून त्यांना आपण चुकल्याचे लक्षात आले. आता घरी कसे जायचं या विचाराने त्यांना रडूच कोसळले. हे पाहून नागरिक जमा झाले. त्यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी जाऊन त्या मुलींना पोलिस ठाण्यात आणले. त्यांनी पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गडचिरोलीतील असल्याचे सांगून सारा प्रकार कथीत केला. मोरे यांनी यापूर्वी गडचिरोलीत कर्तव्य बजावले असल्याने त्यांना परिस्थितीची जाणीव होती. तिघांकडे गावाच्या नाव व नातेवाईकांच्या माहिती पलिकडे काहीच नव्हते. त्यातील दोघींना तेजस्विनी महिला शासकीय वसतीगृह व एकीला बाल संकुलात दाखल केले. यानंतर त्या तिघींची माहिती घेण्याची प्रक्रिया मोरे यांनी सुरू केली. 

गडचिरोलीतील व्यक्ती म्हटलं की त्याचे नक्षलवाद्यांशी काही संबंध आहे का? की तो त्यांना घाबरून येथे आला आहे? हे शोधण पोलिसांचे पहिलं काम असते. मोरे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीतील पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला. त्या तिन्ही मुलींची चौकशी केली. त्या खरोखरच घरातून नोकरीच्या शोधासाठी बाहेर पडल्या होत्या याची खात्री पटली. अखेर आज त्यांना नेण्यासाठी गडचिरोली पोलिसांबरोबर नातेवाईक कोल्हापुरात आले होते. शाहूपुरी पोलिसांनी त्या तिघींना त्यांच्या स्वाधीन केले. ही कामगीरी मोरे यांच्या सोबत पोलिस नाईक निलेश साळोखे, राम तळपे, महिला कर्मचारी सविता पाटील, ज्योती कांबळे यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three missing girl from Gadchiroli special story