एटीएम व मेडिकल फोडल्याप्रकरणी गावातील तिघांना अटक

राजेंद्र वाघ 
शनिवार, 23 जून 2018

कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम व त्यासमोरील एक मेडिकलचे दुकान फोडल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच गावातील तिघांना अटक केली आहे. दरम्यान, एटीएम मशीनमधील रक्कम संशयितांना काढता आली नाही. मात्र, मेडिकलच्या दुकानातून संशयितांनी लंपास केलेला रोख रकमेसह ११ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत उर्फ पाचशे दत्तात्रय जाधव, रोहन उर्फ सोन्या विजय माने, चैतन्या उर्फ भैय्या मारुती नलावडे (सर्व रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात मेडिकल व्यावसायिक कविता विजय भागडे (रा. चिमणगाव) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकटल्याची व चोरीचा प्रकार असल्याची माहिती गाळा मालक सुरेश कुलकर्णी यांनी आज सकाळी पावणेसातच्या सुमारास दूरध्वनीद्वारे दिली.

त्यावर प्रत्यक्ष दुकानात जाऊन पाहिले असता, काऊंटरचे कप्पे उघडे होते. दुकानातून एक हाजाराची रोकड व कॉस्मेटिकचे दहा हजारांचे साहित्य, असा ११ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरुन नेल्याचे तसेच दुकानासमोरील महाराष्ट्र बॅंकेचे एटीएम फोडण्याचाही प्रयत्न अज्ञाताने केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, तिघा संशयितांपैकी एकावर यापूर्वी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला संशयावरुन पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात त्याच्यासह तिघा संशयितांची नावे निष्पन्न झाली. हवालदार साबळे तपास करत आहेत. 

Web Title: Three people from the village arrested for the abduction of ATM and medical