'आयपीएल'वर सट्टा कळविणाऱ्यास तीन टक्के कमिशन! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

सट्टा घेऊन परत आकडे सांगण्याचे काम केल्यावर त्यांना तीन टक्के कमिशन मिळत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. 

सोलापूर - हैदराबाद रस्त्यावरील दहिटणे येथील देवकी नगरमधील घरात आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळला जात असल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. यात तिघांना ताब्यात घेतले आहे. सट्टा घेऊन परत आकडे सांगण्याचे काम केल्यावर त्यांना तीन टक्के कमिशन मिळत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. 

इरफान दावलसाब इनामदार (वय 38, रा. घोंगडेवस्ती, हनुमान मंदिराजवळ, भवानी पेठ, सोलापूर), समीर अब्दूल इनामदार (वय 25, रा. काशीमबी मंझिल, देवकीनगर, दहिटणे, सोलापूर), रहीम अब्दूल हकीम लष्करे (रा. घोंगडेवस्ती, हनुमान मंदिराजवळ, भवानी पेठ, सोलापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांनी महेश येळमेली, आदित्य शहा, राधेश्‍याम ऊर्फ मुन्ना ओझा, अतुल शिरशेट्टी, मनोज मलकूनाईक, अमोल मलकूनाईक, धनराज कोळेकर, युसूफ शेख, सम्राट माने यांच्या सांगण्यावरून जुगार घेतो आणि लोकांना जुगाराचे आकडे कळवितो. त्याबदल्यात आम्हाला तीन टक्के कमिशन मिळत असल्याचे सांगितले. 

हैदराबाद रस्त्यावरील दहिटणे येथील देवकी नगरातील काशीमबी मंझिलमध्ये समीर इनामदार याच्या घरात इंडियन प्रिमिअर लीग क्रिकेट ट्‌वेंटी-ट्‌वेंटीची मॅच टीव्हीवर लाइव्ह चालू असताना मोबाईल फोनवरून सट्टा खेळला जात होता. संशयित आरोपी समोर चालू असलेल्या टीव्हीवर मॅच पाहत होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील क्रिकेट सामन्या वेळी मोबाईलवर फोन करणाऱ्यांकडून सट्टा खेळला जात होता. गुन्हे शाखेचे पोलिस नाईक शीतल शिवशरण यांनी फिर्याद दिली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three percent commission who inform a speculator on IPL