मित्रानेच मित्राला नऊ लाखांना फसविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

काही दिवसानंतर तिघा संशयितांनी नीलेशसह त्याच्या मित्रांना बनावट ओळखपत्र दिले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
 

सातारा : रेल्वेत नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून तीन युवकांची नऊ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जैनउद्दीन मोहमद मुजावर (रा. काशीळ), अजित अर्जुन खंडागळे (रा. पुणे), विश्वजित माने (रा. आष्टा) व सौरभ त्रिपाठी (रा. लखनौ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश विठ्ठल भणगे (वय 24, रा. आकोशी, ता. वाई) याची जैनउद्दीन मोहमद मुजावर, अजित अर्जुन खंडागळे व विश्वजित माने या तिघांबरोबर ओळख झाली होती. या ओळखीतून मुजावर व त्याच्या दोन मित्रांनी रेल्वेत क्‍लार्क म्हणून नोकरीस लावतो, असे सांगून तीन लाख रुपयांची मागणी केली. नीलेशने आरटीजीएस करून संबंधितांना पैसे दिले. त्याची माहिती नीलेशच्या दोन मित्रांना समजल्यानंतर त्यांनीही संबंधितांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी प्रत्येकी तीन लाख रुपये दिले. काही दिवसानंतर तिघा संशयितांनी नीलेशसह त्याच्या मित्रांना बनावट ओळखपत्र दिले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

नक्की वाचा : 'या' बहाद्दराने मागितली चक्क वडापावाची खंडणी

वाचा : वाचनप्रेमींसाठी धक्कादायक बातमी; पुस्तकांचं गाव गुंडाळणार ?

हेही वाचा : ...म्हणून वडिलांनी घातला मुलावर कुऱ्हाडीचा घाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Youths Have Been Booked For Cheating In Satara Police Station

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: