...म्हणून वडिलांनी घातला मुलावर कुऱ्हाडीचा घाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन सावंत व सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी संशयित लक्ष्मण नाळे यांना ताब्यात घेतले आहे. 
 

फलटण शहर : मद्यपी मुलाकडून सातत्याने होणाऱ्या मारहाणीस व त्रासास कंटाळून वडिलांनीच त्याचा खून केल्याची घटना गुणवरे (ता. फलटण) येथे घडली आहे. सुभाष लक्ष्मण नाळे (वय 38) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी वडील लक्ष्मण नाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की नाळे वस्ती (गुणवरे, ता. फलटण) येथील सुभाष लक्ष्मण नाळे हा दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन घरी रोजच दंगा करणे नित्याचेच झाले होते. त्याच्या त्रासाला घरातील सर्व लोक कंटाळले होते. आई, वडील, पत्नीला, तर रोजच मारहाण होत होती, तसेच फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील बहीण सुरेखा वसंत पवार यांना देखील तो सतत त्रास देत असे. सुभाषच्या रोजच्या त्रासाला कुटुंबीयांसह नातेवाईकही कंटाळले होते. शनिवारी (ता. आठ) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण नाळे यांनी मुलगा सुभाष हा झोपेत असताना कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर दुखापत करून त्यास जीवे मारले असल्याची तक्रार मृताचे चुलते शंकर बाळू नाळे यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन सावंत व सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी संशयित लक्ष्मण नाळे यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास श्री. बोंबले करीत आहेत. 

जरुर वाचा :  काळजाला भिडतेय स्मशानातील माया

हेही वाचा - सातारचा धोनी जपानच्या क्रिकेट टीममध्ये

नक्की वाचा : ...म्हणून त्याने आईला मारले

वाचा : जेव्हा हवालदाराच पोलिस अधीक्षकांवर कारवाई करताे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father killed Son In Phaltan