टिंबर मार्केटमध्ये ‘वखारी’ला आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

कोल्हापूर - टिंबर मार्केट येथील ‘वखारी’ला पहाटे अचानक आग लागली. बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जवांनानी ही आग आटोक्‍यात आणली. 

आगीत इलेक्‍ट्रिक मोटारी, मशीन्स्‌, कापलेले लाकूड असे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटने आग लागली असावी, अशी घटनास्थळी चर्चा सुरू होती. 

घटनास्थळासह अग्निशामक दलाकडून मिळलेल्या माहितीनुसार, बाबूजमाल परिसरात राहणारे अनिल दामोदर बगाडे यांची टिंबर मार्केट येथे महादेव मंदिराला लागून ‘बगाडे सॉ मिल’ नावाची वखार आहे. लाकडी पार्टीशन टाकून वखारीत वेगवेगळी कामे केली जातात. 

वखारीत रात्री अल्लासाहब हे सुरक्षारक्षक म्हणून काम पाहतात. काल सायंकाळी मालकांनी वखार बंद केली. त्यांचे मित्र भोजी राठोडे हे वखारीच्या कार्यालयात रात्री झोपले होते. मध्यरात्री तीनच्या सुमारास वखारीतून काहीतरी पेटत असल्याचा आवाज राठोड यांच्या कानी पडला. ते तातडीने बाहेर आले. त्यांनी सुरक्षारक्षक अल्लासाब याचे लक्ष याकडे वेधले. तसे त्यांना वखारीत आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून राठोड यांनी थेट टिंबर मार्केट येथील फायर स्टेशन गाठले. त्यांनी वखारीला लागेल्या आगीची माहिती दिली. तसेच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. यात वखारीचे पत्रेही उडून गेले. त्यामुळे घटनास्थळी आणखी तीन अग्निशमनच्या गाड्या बोलवून घेण्यात आल्या. ही घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकही तेथे जमा झाले. सुरक्षारक्षकाने वखारमालकांनाही तेथे बोलवून घेतले. तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी आग आटोक्‍यात आणली. 

आगीत १४ इलेक्‍ट्रिक मोटारी, धार लावण्याचे मशीन, दोन ग्रॅंडर मशीन, कटर मशीन, एक लेथ मशीन, वेगवेगळ्या प्रकारचे साचे, लाकडी कंपाऊंडसह कापलेले किमती लाकूड जळून खाक झाले. विद्युत मीटरसह वायरिंगही आगीत जळाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

Web Title: Timber Market fire

टॅग्स