विज्ञान युगातही प्राचीन काळातील अंदाजांवरच पावसाचे जुळते गणित   

 In the time of science, the rains predictions on panchang
In the time of science, the rains predictions on panchang

येवला - आजकाल पाऊस किती बेभरवशाचा झाला हे सांगणे नको. अगदी चातकासारखी वाट पहायला लावणाऱ्या पावसाच्या मागेपुढे शेतकरीच नव्हे तर सर्वच जण घुटमळतात. याचा माग घेतांना हवामान खात्याच्या अंदाजाकडे नजरा लागून असतात पण काहीही असो विज्ञान युगात आजही पर्जन्य नक्षत्र आणि वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधण्याला तितकेच महत्व आहे. किंबहुना आजही ग्रामीण भागात हवामान खात्यापेक्षा नक्षत्रावरच भरवशा असून यावरच पावसाचे गणित जुळवले जात आहे. 

भारतात प्राचीन काळापासून पावसाचा अंदाज नक्षत्रांनुसार जुळवला जातोय. मागील काही वर्षात वेधशाळा आधुनिक वैज्ञानिक नियमांवर आधारित पावसाचा अंदाज वर्तवू लागल्या खऱ्या पण नक्षत्रांना मात्र, हा पर्याय होऊ शकलेला नाही. आजही शेतकरी पंचांग आणि त्यातील नक्षत्रविचारांचा पर्जन्य विषयाकरीता विचार करतांना दिसतो. मात्र, पर्जन्य नक्षत्र आणि त्यांची वाहन यावरून वर्तवलेल्या अंदाजाला वैज्ञानिक शास्त्रीय कारणे नसून हे केवळ ठोकताळे असतात हे माहित असूनही त्यावरील विश्वास घटलेला नाही. 

प्राचीन काळापासून प्रसिद्ध पर्जन्यसूक्त देखील पाऊस अनुकुल होण्याकरिता विधिवत वाचले जाते. अनेक वर्षापासून प्राचीन खगोलवेत्ता, ऋषि-मुनि जवळ आजसारख्या विकासित वेधशाळा आणि सूक्ष्म परिणाम देणारे वैज्ञानिक उपकरणेही नव्हती. तरीही आपले अनुभव, ज्ञान व छोटे मोठे उपकरणांच्या मदतीने व आकाशीय ग्रह-नक्षत्र आदींचे अध्ययन करून पर्यावरण व वर्षा यांचे पूर्वानुमान करत होते. गर्ग, पाराशर आदिंच्या वेळी तर विज्ञान गुरूशिष्य परंपरेत होते. कालांतराने अनेक ज्योतिर्विद यांचेकडून हे ज्ञान सर्वसुलभ झाले आहे. तेव्हापासून आजच्या विज्ञान युगातही हे परिणाम मनात घर करून आहेत. एकूण २७ मधून ९ नक्षत्रे पावसाची पावसाचे प्रमाण समजण्यास नक्षत्राना आजही विशेष महत्व आहे.

पूर्वीचे लोक अनुभवावर पावसाचा अंदाज लावत होते. आजही या गोष्टी पाळल्या जातात. विशेषतः पाणी गोड न लागणे, आकाशात कावळयांच्या अंडयांसारखे ढग दिसणे, दिशा गायींच्या डोळयांसारख्या दिसत असतील, उगवतांनाचा सूर्य अत्यंत प्रखर असल्यास, मुंग्या अन्न घेत जोरात जावू लागल्या, मासे पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करणे, चिमण्या धुळीत स्नान करतांना दिसत असतील, कोकिळ रात्री कुंजन करत असतील, मयूर समुहाने केकारव करत असतील, चंद्राजवळ वलय असल्यास, 
मांजर नखांनी जमीन पोखरते, कुत्रे घरांवर चढून वा उंच ठिकाणी चढून आकाशाकडे पहात असतील तर २४ तासाच्या आत मोठा पाऊस पडतो. असा अंदाज बांधला जातो. ऋतुमानानुसार पावसाचे आलेले अनुभवानुसार जुन्या लोकांनी या पावसाला ऋतू व प्रमाणावरून पावसालाही नावे दिली आहेत. जुन्या लोकांनी नक्षत्राच्या अनुभवावर पडणाऱ्या पावसाचा अंदाजाणे काही म्हणीही रूढ केल्या आहेत. आजही या म्हणींचा ग्रामीण भागात बोलीभाषेत सर्रास वापर होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com