तलाव उशाला आणि कोरड घशाला

संजय हेगडे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा आणि भीमा या दोन नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

- वीर भाटघरच्या पाण्यावर अवलंबून असणारा तिसंगी तलाव मात्र आजूनी कोरडा आहे.

तिसंगी : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे नीरा आणि भीमा या दोन नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वीर भाटघरच्या पाण्यावर अवलंबून असणारा तिसंगी तलाव मात्र आजूनी कोरडा आहे. त्यामुळे तलाव उशाला आणि कोरड घशाला झाली असून या परिस्थितीला प्रशासनाचा चालढकलपणा कारणीभूत ठरत आहे.

तिसंगी-सोनके गावाना वरदान ठरलेला तिसंगी तलाव आज कोरडा आहे. सोलापूर जिल्ह्या सह पंढरपूर-सांगोला भाग मात्र कोरडाच आहे. परीसरात चारा-पाण्याची भयान अवस्था आहे. चार्यासाठी माझा शेतकरी राजा बायका पोर उघड्या वर सोडून, आपला संसार उघड्यावर छावणीवर जनावरांच्या सोबत थाटला आहे. एकिकडे महाराष्ट्रात नद्यानाल्यांना पूर आला आहे. दुसरीकडे शेतकरी चारा पाण्यावीना होरपळत आहे. आणि शासन व शासनाचे अधिकारी  शेतकऱ्यांचा हाल करीत आहेत.

तिसंगी तलाव कोरडा असताना तलावात पाणी सोडण्याचे नाव काढत नाहीत. कालव्याच्या वितरिकेतून पास नसताना राजरोस पणे पाणी सोडणे चालू आहे. पाणी वाया घालवून अधिकारी दुष्काळात दिवाळी साजरी करीत आहेत. पण तलावात पाणी सोडण्याचे नाव घेत नाहीत. तलावाखालील  अकरा गावातील वंचित जनता होरपळून निघत आहे. या भागातील मतदार संघ वंचित असल्याने कोणताही लोकप्रतिनिधी दखल घेण्यास तयार नाही. तालुका पंढरपूर, आमदार सांगोल्याचा यामुळे तिसंगी तलाव परिसरातील शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाटका झाली आहे.....

तिसंगी तलावात वीर- भाटघर धरण भरल्यावर तलावात पाणी सोडण्याचे नियम असताना अधिकारी  नियम मोडतात. शेतकऱ्यांचा पाला पाचोळा करतात. शेतकऱ्यांचा वाली कोण. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तिसंगी तलावात पाणी सोडण्या संदर्भात  तिसंगीचे माजी सरपंच तानाजीराव वाघमोडे यानी माढा मतदार संघाचे खाजदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यानी फोन लावून तलावात पाणी सोडण्यात यावे अशी विनंती केली. तर खाजदार साहेब यानी फलटन चे अधिकारी अमोल निकम याना फोन वर विचारणा केली निकम यानी दोन दिवसाच डी ४ व डी ५  चे पाणी बंद करूण तिसंगीतलावात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tisangi dam remains dry