... तर स्वच्छतागृहाचा प्रश्‍न निकाली

Toilet
Toilet

कोल्हापूर - गणेशोत्सव, नवरात्रासह इतर सणांची मालिकाच आता सुरू होत आहे. शहरात स्वच्छतागृहांची अपुरी संख्या असल्याने अनेक वाहनधारकांची कुचंबणा होते. यावर उपाय म्हणून नियमानुसार शहरातील प्रत्येक पेट्रोलपंपावर शौचालयाची सोय उपलब्ध झाल्यास हा प्रश्‍न निकाली निघणार आहे. शहरात शौचालयांची संख्या कमी असल्याने पर्यटकांसह वाहनधारकांची होणारी कुचंबणा दूर होऊ शकते.

प्रत्येक पेट्रोलपंपावर वाहनांच्या चाकात भरण्यासाठी हवा, पिण्याचे शुद्घ पाणी आणि महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सेवा देणे बंधनकारक आहे. ज्या कंपनीचा पेट्रोल-डिझेल पंप आहे, त्या कंपनीद्वारे याची पाहणी करणे, ते सुस्थितीत आहे याची माहिती घेणेही आवश्‍यक आहे; तरीही शहरातील बहुतांश पेट्रोलपंपांवर स्वच्छतागृहेच आहेत की नाहीत, हे कळत नाही. पंपांवरील स्वच्छतागृहे वाहनधारकांसाठी २४ तास खुली असली पाहिजेत. पेट्रोलपंपधारकांनी पुढाकार घेऊन प्रशस्त शौचालये उभारल्यास प्रश्‍न निकाली निघेल. 

स्वच्छतागृहे असणारी ठिकाणे -
अंबाबाई मंदिर परिसर, ओढ्यावरील यल्लम्मा मंदिर परिसर, रंकाळा टॉवर, खासबाग मैदान, बागल चौक परिसर (काहींना कुलूप आहे.)

प्रस्तावित ठिकाणे - शिंगोशी मार्केट, जुना राजवाडा, पद्माराजे हायस्कूल, नंगिवली चौक शहरातील स्वच्छतागृहांचा प्रश्‍न निकाली निघण्यास हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभाग प्रशासन म्हणून पेट्रोलपंपधारक, कंपन्यांचे अधिकारी यांचा समन्वय साधून त्याची अंलमबजावणी करण्याचा प्रयत्न करेल. वाहनधारकांसाठी, ग्राहकांसाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वच्छतागृहे नियमानुसारच असली पाहिजेत. पंपधारकांनीही सामाजिक, माणुसकीच्या नात्याने स्वच्छतागृहे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा. ती वापरास उपलब्ध करावीत, त्याबाबतचा फलक पंपावर दर्शनी भागात उभा करावा.
(विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी)

- जिल्ह्यात २१६ पेट्रोल-डिझेल पंप
- शहरात एकूण २२ पेट्रोल-डिझेल पंप
- बीपीसी, आयओसी आणि एचपीसी या तीन कंपन्यांचे पंप

असून अडचण...
काही पंपांवर स्वच्छतागृहे आहेत, हेसुद्धा ग्राहकांना कळत नाही. महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आवश्‍यक आहेत. ती कोठे आहेत, याचे फलक प्रत्येक पंपावर दर्शनी भागात पाहिजेत. काही ठिकाणी कागदोपत्री दाखविण्यासाठी स्वच्छतागृहे आहेत. प्रत्यक्षात तेथे जाणे-येणेही ग्राहकाला शक्‍य होत नाही. याबाबतही संबंधित कंपनीच्या विक्री अधिकाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे.

आकडे बोलतात..(महापालिकेतून)
महिला स्वच्छतागृहे आकडेवारी

- २०१६ - १७ च्या आराखड्यात १३ ठिकाणी मंजुरी, त्यांपैकी पाच ठिकाणचे काम पूर्ण
- ५० लाखांचा निधी मंजूर - प्रत्येकी दीड लाखाचा निधी 

सध्या स्वच्छतागृहे असणारी ठिकाणे - अंबाबाई मंदिर, ओढ्यावरील यल्लम्मा मंदिर, रंकाळा टॉवर, खासबाग मैदान, बागल चौक परिसर (काहींना कुलूप आहे.)
प्रस्तावित ठिकाणे - शिंगोशी मार्केट, जुना राजवाडा, पद्माराजे हायस्कूल, नंगिवली चौक

प्रत्येक पेट्रोलपंपावर स्वच्छतागृह पाहिजेच. सणासुदीच्या वेळी तरी मालकांनी किमान महिलांसाठी २४ तास सेवा दिली पाहिजे. इतर वेळीही ग्राहकांसाठी स्वच्छतागृहे, पाणी आणि हवा यांची सोय नियमानुसार करावी लागते, तरीही माणुसकी म्हणून ज्या ठिकाणी महिला, पुरुषांना सहज जाणे शक्‍य आहे, अशा ठिकाणी स्वच्छतागृहे उभी करावीत. जेथे अशा सुविधा नाहीत, त्यांच्या तक्रारी विक्री अधिकाऱ्यांकडे कराव्यात. त्यांचे क्रमांक पंपावर उपलब्ध असतात.
- गीजकुमार माणगावे (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशन)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com