पांचगणी टोल नाक्याचावर पर्यटन कर वसुलुसाठी दंडेलशाही

bhilar.
bhilar.

भिलार - पांचगणी टोल नाक्याचा 'झोल' सध्या वाढु लागला असून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची 'दादागिरी' 'राजरोसपणे'  स्थानिकांच्या जीवावर बेतत आहे. दारूच्या नशेत बेधुंद असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा काल खुद्द स्थानिक लोकप्रतिनिधींना अनुभवण्यास मिळाला त्यामुळे या टोल प्रशासनाला आगोदर आवरा, कर्मचाऱ्यांची दबंगगिरी रोखा अन्यथा स्थानिकांच्या रोशास सामोरे जावे लागेल असा इशारा येथील स्थानिकांनी दिला आहे.

पांचगणी या पर्यंटनस्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून दांडेघर नाक्यावर पर्यटन, प्रदूषण असे विविध कर वसुली केली जातात. पूर्वी गिरीस्थान नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यामार्फत ही वसुली केली जात होती. परंतु, नंतर ठेकेदारी क्षेत्राचा अवलंब केला आहे. नगरपालिका प्रशासनामार्फत खाजगी ठेकेदारांकडून या करांची वसुली केली जात आहे. हे ठेकेदार बाहेरचे असल्याने या ठिकानावरील स्थानिकांचे त्यांना काहीही देणे घेणे नाही गाड्या अडवून फक्त पैसे उकळणे हाच धंदा त्यांचा सध्या सुरु आहे. 

गाड्या अडवून कर वसुली करण्यासाठी शिस्तबद्धता नाही. दहा ते पंधरा कर्मचारी एका लाईनमध्ये उभे राहून गाड्या थांबवल्या जात आहेत. पर्यटकांभोवती घोळका करून अक्षरशा दहशतीखाली कर वसुली केली जातेय. भाषासुद्धा अर्वाच्च असून पर्यटकाना दमात घेतले जात आहे. गाडी पुढे गेली तर गाडीमागे धावत जाऊन गाड्या अडवल्या जात आहेत. टोलचे दरपत्रक नाक्यावर लावले गेले नाही त्यामुळे पर्यटकाना हुज्जत घालावी लागते. बरेचसे कर्मचारी दारूच्या नशेत नेहमी तर्र आढळतात. स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून याबाबत जाब विचारला त्यावेळी चष्म्यातून पाहायला मिळतील अशा आकड्याचे दरपत्रक लावला आहे.

काल संध्याकाळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, गणापातशेठ पार्टे आणी प्रवीण भिलारे हे वाईहून पांचगणीकडे येत असताना दांडेघर नाक्यावर आम्ही स्थानिक आहोत असे सांगूनही गाडी अडवण्याचा प्रताप कर्मचाऱ्यांनी केला. बेफाम दारू प्यायलेला एक कर्मचारी सुरु गाडी अडवण्यासाठी रस्त्यात आला. अशा वेळी जर ब्रेक लागला नाही तर मात्र मोठा अनर्थ होऊ शकतो याची जाणीवही या कर्मचाऱ्यांना नसावी. आम्ही स्थानिक असल्याचे सांगूनही तो ऐकण्यास तयार नव्हता शेवटी हुज्जत घालून गोंधळ करू लागला. नशेत तर्र असणारा कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हता काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अशा प्रकारे मनगटशाहीने टोल वसुली होत असेल तर स्थानिक मात्र हे कदापिही खपवून घेणार नाहीत. अशा प्रकारची दंडेलशाही आम्ही चालु देणार नसून, स्थानिकाना जर त्रास दिल्यास त्याचे परिणाम नाका प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. 

पांचगणी हे पर्यटन स्थळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना प्रवेशद्वारावरच आपुलकीची वागणूक मिळायला हवी परंतु, टोल नाका कर्मचारी मात्र झुंडशाहीने वसुली करीत असल्याने पर्यटक ही शहरात प्रवेश कारण्याआगोदरच धसका घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com