Nipani : लाल चिखल झालेल्या टोमॅटोला भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nipani : लाल चिखल झालेल्या टोमॅटोला भाव

Nipani : लाल चिखल झालेल्या टोमॅटोला भाव

sakal_logo
By
अशोक परीट

निपाणी : भाव कमालीचा घसरल्याने दोन महिन्यापूर्वी रस्त्यावर पडून लाल चिखल झालेल्या टोमॅटोची सध्या आवक कमालीची घटली आहे. परिणामी मंडईत त्याचा भावही तितकाच वधारला आहे‌. काही दिवसांपूर्वी ६ ते १० रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता सफरचंदाच्या भावात ८० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या आहारातून टोमॅटो सध्या गायब झाला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री कार्यालय, वर्षा निवासस्थानी पुन्हा कोरोनाचा शिरकाव!

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने झोडपल्याने टोमॅटो उत्पादनावरच गंभीर परिणाम झाला. त्यात बदलत्या प्रतिकूल हवामानाची भर पडली. परिणामी टोमॅटो उत्पादन कमालीचे घटले. त्यामुळे स्थानिक परिसरातील आणि बाहेरूनही येथील घाऊक बाजारात येणाऱ्या टोमॅटोची आवक गेल्या पंधरा दिवसात कमालीची घटली आहे.

घाऊक बाजारात येणारा टोमॅटो ४०० ते ६०० रुपयांना दहा किलो या प्रमाणात उपलब्ध होत आहे, तर तोच टोमॅटो किरकोळ बाजारात साठ ते ऐंशी रुपयांना किलो या दराने विकला जात आहे. उपलब्ध असेल तर उत्तम प्रतीचा टोमॅटो १०० रुपये किलोनेही विकला जात आहे.

हेही वाचा: मुंबई NCB ची मोठी कारवाई; नांदेडमध्ये 1.1 टन गांजा जप्त

'टोमॅटोचे उत्पादनच नसल्याने भाव वाढूनही त्याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत नाही. ग्राहकांनाही फटका बसला आहे. आता नवीन लावणीचा टोमॅटो बाजारात आल्यानंतरच त्याचे भाव कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल. त्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागेल.'

-सलीम बागवान, घाऊक भाजी विक्रेता, निपाणी

loading image
go to top