'येळकाेट येळकाेट जय मल्हार'ने दुमदुमणार पाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

खंडोबा देवाच्या यात्रेसाठी आजपासूनच भाविक यात्रेसाठी दाखल होऊ लागल्याने गर्दी वाढू लागली आहे. यात्रा सुरळीतपणे पार पडण्यासाठी या वर्षी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

उंब्रज (जि. सातारा) : महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पाल येथील खंडोबा देवाची यात्रा उद्या (बुधवारी) साजरी होत आहे. यात्रेसाठी पालनगरी सजली असून, आजपासूनच भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.

नक्की वाचा - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंचा पहिला प्रयाेग

यात्रे निमित्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह अन्य एक पोलिस उपअधीक्षक, तीन पोलिस निरीक्षक, 30 सहायक पोलिस निरीक्षक व सहायक फौजदार, 390 पोलिस कर्मचारी, 350 होमगार्ड, स्वयंसेवक व पोलिस पाटील, स्ट्रायकिंग फोर्स, विशेष पोलिस पथक असा फौजफाटा यात्रेसाठी तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी यात्रा काळात अनूचित प्रकार घडू नये, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर उभे करण्यात आले आहेत. मंदिराजवळ असणाऱ्या काशीळ बाजूकडील व मंदिरासमोरील पुलावर गर्दीतला नियंत्रणात ठेवण्यासाठी बॅरिकेड उभारले जाणार आहेत.

मानकऱ्यांना मंदिरात प्रवेशासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली आहे. वाहनांच्या पार्किंग जागा, एसटी बस स्थानक, खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा - पुण्यातील व्यापाऱ्याचा संशयित खूनी नाना पेठेतील

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tommorrow Khandoba Yatra At Pal District Satara