esakal | 'केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची अर्धवट माहिती'
sakal

बोलून बातमी शोधा

on the topic of vaccination jayant patil criticized central government in sangli

कदाचित, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली.

'केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची अर्धवट माहिती'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत असे ट्विट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा - कोरोनाने मरणारे जगण्याच्या लायक नसतात; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की काल (बुधवार) केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे. कदाचित, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, का अशी मनात शंका आहे.

महाराष्ट्राला 85 लाख लसी मिळाल्या आहेत. मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12.30 कोटी तर ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 4.73 लाख इतकी आहे. गुजरातला मिळाल्यात 80 लाख लसी तिथे लोकसंख्या 6.50 कोटी आहे, तर ऍक्‍टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 17 हजार. देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे.

loading image