बा रायगड'तर्फे दुर्लक्षित गडकोटांवर हक्काचे तोरण 

baa raigad.jpg
baa raigad.jpg

सांगली-  स्वराज्याची राजधानी रायगड म्हणजे मराठी मनाची अस्मिता. त्या गडाप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्थापन झालेल्या "बा रायगड' परिवाराने दसऱ्याचे निमित्त साधून दुर्लक्षित गडांचे पूजन केले. जिल्ह्यातील जुना पन्हाळा (ता. कवठेमहांकाळ), कोळदुर्ग व बानूरगड (ता. खानापूर), बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे गडकोट पूजन व शस्त्रपूजन केले. दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे.

पुणे जिल्ह्यातून सुरु झालेल्या बा रायगड परिवाराचा पसारा राज्यभर आहे. तरुण पिढीने इतिहास केवळ परीक्षेतील गुणांपुरता न अभ्यासता प्रत्यक्ष ओळखीसाठी दुर्गसंवर्धन मोहिमा आयोजित केल्या जातात. दैदिप्यमान इतिहासाचा ठेवा जपण्यासाठी स्वच्छता, डागडुजी, दुरुस्तीसारखी कामे कार्यकर्ते हिरीरीने करतात. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बर्हिजी नाईक यांच्या बानूरगड येथील समाधीचे संवर्धन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जुना पन्हाळा गडावर अस्तंगत होत चाललेला खंदक, पाण्याचे टाके सुस्थितीत आणले आहे. वेगवेगळी झाडे लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी पेलली आहे. 

कोळदुर्ग येथे पडझड झालेल्या वास्तूंच्या डागडुजीसाठी श्रमदान सुरु असते. ऐतिहासिक अवशेषांवर वाढलेले गवत, झाडे हटवली जातात. बहादूरवाडी ऐतिहासिक गढीवरील बुरुज, खंदक अबाधित राखण्यासाठीही प्रयत्न होताहेत. दसऱ्याला गडकोटावर तोरण लावण्यात आले. परिवारातील कार्यकर्त्यांनी गडावरच दसरा साजरा केला. जिल्हा समन्वयक कृष्णा गुडदे, पवनपुत्र जकाते, राजेश जाधव,गणेश कुंभार, रोहित जाधव, अनिकेत औताडे, गणेश पाटील, सुशांत जाधव, सागर कटारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com