
नेर्ले (सांगली) : वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग तीर्थक्षेत्र बेटातील संथ वाहणाऱ्या 'कृष्णा माईने' निळ्याशार पाण्याने बोडक्या दगडावरून वाहत आता मोकळा श्वास घेतला आहे. तब्बल अंदाजे ४५० फूट लांबीचे पात्र या ठिकाणी कृष्णा नदीला लाभले आहे. त्यामुळे तरुण तरुणींसह कौटुंबिक पर्यटकांची गर्दी होत आहे. जुन्या काळातील उंच बांधलेला पूल. त्याच्याखाली काळ्याशार बोडक्या काटेरी दगडावरून जाणारे निळे पाणी मन मोहून घेते. छोट्या बंधाऱ्यावरून चालताना तर प्रत्यक्ष नदीतून चालत असल्याचा प्रत्यय येतो.
राम व हनुमान मंदिराला वळसा
तांबवे गावाच्या बाजूला बंधाऱ्याच्या अडवलेलं पाणी स्वतःहून वाट काढत पुढे दगडावर आपटून दुधाळ फेसयुक्त बनून पुढे निघून जाते. रुंदी असणाऱ्या पात्रातून हे पाणी राम मंदिर व हनुमान मंदिर यांना दोन्ही बाजूंनी वळसा घालून पुढे बहे गावावरून सांगलीकडे नदी मार्गस्थ होते. नदीवर गेल्यानंतर विस्तीर्ण पात्रात दगड आणि कडा यांवर खळखळणारं निळंशार पाणी लक्ष वेधून घेते. मासे पकडणारी मंडळी दिवसभर गळ टाकून बसतात. कोळी बांधव जाळे टाकून आपली गुजराण करतात. आजूबाजूची स्वच्छता झाल्यामुळे आता ख-या अर्थाने निळशार दिसणाऱ्या पाण्याच्या बाजूला काळ्या दगडावर बसलेले पांढरे बगळे रांगोळी काढल्या सारखे भासतात. तर काही ध्यानस्थ वाटतात.
पुरातन काळातील बेट
रामलिंग बेट हे पुरातन काळापासून आहे. ते तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. मंदिराकडे जाण्यासाठी नदीतून कठडे बांधले आहेत, त्यावरून चालत जाता येते. मंदिराच्या परिसरातील आंबा, वड, चिंच व इतर झाडे यांची थंडगार सावली आहे. तिथेही शांत वातावरणात भैरवी रागात गाणं म्हणणाऱ्या पाण्याचा सूर ऐकू येतो.
रामलिंग बेटवर कसे याल?
आख्यायिका
भगवान श्री राम हे बहे परिसरात वास्तव्यास होते अशी या परिसराची आख्यायिका सांगितली जाते. यावेळी त्यांनी रामलिंगाची स्थापना येथे केली. रामलिंग स्थापना करीत असताना कृष्णा नदीच्या पाण्याचा वेग वाढला. रामलिंग पाण्यात जाईल म्हणून रामभक्त हनुमान यांनी आपल्या दोन्ही भुजा आडव्या केल्या व पाणी दोन्ही पात्रातून निघून गेले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या नदीला दोन पात्र आहेत. १५७३ ला अकरा मारुती पैकी एक मारुतीचे मंदिर समर्थ रामदास यांनी स्थापन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.