

Police Book Tractor Driver
sakal
कवठेमहांकाळ : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला. देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास एका शेतात ही घटना घडली. सुभाष किसन माळी (वटकळी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे मृत्यू झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे.