नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक शाखेने दिले गुलाबाचे फुल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

क्रेनच्या सहायाने रोडवर व फुटपाथवर पार्किंग करण्यात आलेल्या एकूण 30 दुचाकींवर कारवाई करण्यात आली. तसेच एकूण सात चारचाकी वाहनांना जॅमर लावून कारवाई करण्यात आली.

सोलापूर : पूना नाका येथे शहर वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट वापरणाऱ्या, सीटबेल्ट वापरणाऱ्या आणि मूळ कागदपत्रे जवळ बाळगणाऱ्या वाहन चालकांचा गुलाबाचे फुले देऊन सत्कार करण्यात आला. 

या वेळी पोलिस निरीक्षक सुनील जाधव, सहायक पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक चवरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने सात रस्ता, एम्प्लॉयमेंट चौक, पार्क चौक, सरस्वती चौक, शिवाजी चौक, संभाजी चौक याठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेचे पथकही यात सहभागी झाले होते.

क्रेनच्या सहायाने रोडवर व फुटपाथवर पार्किंग करण्यात आलेल्या एकूण 30 दुचाकींवर कारवाई करण्यात आली. तसेच एकूण सात चारचाकी वाहनांना जॅमर लावून कारवाई करण्यात आली.

Web Title: traffic police in Solapur